Take a fresh look at your lifestyle.

‘नोकिया’ने ‘ओप्पो’ला खेचले कोर्टात…! पाहा कशावरुन पेटलाय दोन दिग्गज कंपन्यांमध्ये वाद..?

टेक विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी टेक जगतातील विश्वासू कंपनी नोकियाने (Nokia) चिनी ओप्पो (oppo) कंपनीविरोधात भारतासह इंग्लड, फ्रान्स व जर्मनीत खटले दाखल केले आहेत. यानिमित्ताने जगातील दोन मोठ्या कंपन्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Advertisement

नोकिया ही टेक विश्वातील जुनी आणि विश्वासू कंपनी आहे. मोबाईल मार्केटच नव्हे, तर टेक्नॉलॉजी संबंधित इतर बाजारांतही नोकिया लोकप्रिय आहे. फिनलँड स्थित ही कंपनी वेळोवेळी नवनवीन टेक्नॉलॉजी शोधत असते.

Advertisement

नेमका वाद काय..?
नोकिया व ओप्पाे यांच्यात 2018 मध्ये एक ‘लायसन्स अ‍ॅग्रिमेंन्ट’ झाले होते. त्यानुसार, नोकियाच्या एका टेक्नॉलॉजीचा वापर ‘ओप्पो’ कंपनी आपल्या प्राॅडक्ट्समध्ये करू शकणार होती. ही कोणती टेक्नॉलॉजी आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Advertisement

काही दिवसांपूर्वी या ‘लायसन्स’ची वैधता संपली. त्यानंतर ओप्पो आणि नोकियामध्ये पुन्हा या कराराचे नूतनीकरण करण्यात येणार होते. मात्र, ओप्पोने नूतनीकरण न करताच, नोकियाच्या टेक्नॉलॉजीचा वापर सुरु ठेवला. त्यामुळे नोकीयाने ओप्पोवर हा खटला दाखल केला आहे.

Advertisement

नोकीया आणि ओप्पो यांच्यातील वाद, म्हणजे चिनी कंपनीची मनमानी असल्याचे बोलले जाते. नोकिया कंपनीने नवीन ऑफरसह लायसन्स अ‍ॅग्रिमेंट ओप्पोसमोर सादर केले होते; परंतु ओप्पोने ते मान्य करण्यास नकार दिला.

Advertisement

‘लायसन्स’ रिन्यू न करता ओप्पोने टेक्नॉलॉजीचा वापर करणे बेकायदेशीर असल्याने नोकियाने ओप्पोविरुद्ध patent infringement म्हणजे पेटंट उल्लंघनाचा खटला दाखल केला आहे.

Advertisement

घरबसल्या कारलोन, कार एक्सचेंजचीही सोय.. पाहा कोणत्या कंपनीने ग्राहकांसाठी आणलीय अनोखी सुविधा..?
Blog : आमचा वटवृक्ष कोसळला; पहा नेमके काय म्हटलेय रविकांत तुपकरांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply