Take a fresh look at your lifestyle.

पुरुष ‘गुगल’वर काय शोधतात..? संशोधनातून आली धक्कादायक माहिती, जाणून घेण्यासाठी वाचा..

‘अवघ्या ब्रह्मांडाचा ज्ञाता, ‘गुगल’ माझा भ्राता..’ असे म्हटलं तर ते वावगं ठरू नये.. कारण तुमचा कोणताही प्रश्न असो, त्यावर उत्तर एकच, ते म्हणजे ‘गुगल..’ कोरोनामुळे आता लोकांचा बराचसा वेळ इंटरनेटवरच जातो. अशा काळात अनेक जण आपल्या अडचणी ‘गुगल’कडेच मांडत आहेत. मात्र, ‘गुगल’ने दिलेली उत्तरे किती खरी, किती खोटी हेही समजून घेतले पाहिजे, नाहीतर त्यातून वेगळीच समस्या उभी राहू शकते..

Advertisement

याबाबत frommars.com या संकेतस्थळाद्वारे एक अनोखे संशोधन करण्यात आले, ते म्हणजे पुरुष ‘गुगल’वर सर्वाधिक काय शोधतात? ‘गुगल’ला गुप्तपणे काय विचारतात? विशेष म्हणजे, त्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

Advertisement

पुरुष काय शोधतात..?

Advertisement
  • संशोधनात असे आढळले, की दरवर्षी 68,600 लोकांनी ‘गुगल’वर कमकुवत इरेक्‍शन हे नपुंसकत्व आहे किंवा ते नपुंसक तर नाही ना, याचा शोध घेतल्याचे समोर आलेय.
  • तसेच दरवर्षी सरासरी 68,400 लोकांनी ‘गुगल’वर असं ‘सर्च’ केले, की ‘काय शेव्हिंग केल्याने दाढीचे केस अधिक वाढवतात..?’
  • पुरुषांना स्तनाचा कर्करोग होतो की नाही, हे दरवर्षी 61,200 लोकांनी ‘गुगल’वर शोधल्याचे आढळले.
  • डोक्यावर टोपी घातल्याने, वेणी वाढविण्यामुळे पुरुषांचे केस गळतात का, हे दरवर्षी सरासरी 52,100 लोकांनी शोधले आहे.
  • तसेच सुमारे 51,000 लोकांनी वर्क आउटनंतर ताबडतोब प्रथिने घ्यावी की कोणते प्रोटीन खावे, याचा शोध घेतला आहे.

पुरुषांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे..
एखाद्याला कमकुवत ‘इरेक्‍शन’ जाणवत असेल, तर त्याचा अर्थ नपुसंकताच आहे, असे नव्हे. वृद्धांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या आरोग्य समस्या बर्‍याच वेळा त्याला कारणीभूत ठरतात. अशा परिस्थितीत लोक जीवनशैलीत काही बदल करून या समस्येवर विजय मिळवू शकतात.

Advertisement

शेव्हिंग केल्याने तुमचे केस जाड होतात की नाही, याचा काही पुरावा नाही. आपण आपल्या केसांमध्ये किंवा चेहर्‍यात काही बदल करीत असल्यास, त्याची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी जास्त औषध घेतल्यामुळे हे होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितलेय.

Advertisement

पुरुषांमध्ये महिलांच्या इतक्या प्रमाणात नाही, तरी स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पुरुषांमधील इतर कर्करोगांपेक्षा हे खूपच वेगळं आहे. वयाच्या 60 व्या नंतर पुरुष या समस्येला सामोरा जाऊ शकतात.

Advertisement

कामाची बातमी.. टाटांची कंपनी देणार फ्रेशर तरुणांना नोकरीची संधी, वाट कसली पाहता, लागा तयारीला..
चिनी कंपन्यांनी लाखो भारतीयांना लुटले, ‘फेक अ‍ॅप’च्या माध्यमातून कोट्यवधींचा गंडा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply