Take a fresh look at your lifestyle.

पृथ्वीच्या दिशेने येतेय महाभयंकर वादळ..! पाहा काय नुकसान होऊ शकते..?

नवी दिल्ली : सूर्याच्या परिमंडळातून निर्माण झालेले एक महाभयंकर वादळ (Storm) पृथ्वीच्या दिशेनं झेपावत असून, ते आज (रविवारी) वा उद्यापर्यंत (सोमवारी) पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलंय. या वादळाचा वेग ताशी 1609344 किलोमीटर एवढा प्रचंड आहे. अर्थात पृथ्वीवर पोहोचेपर्यंत या वादळाच्या वेग कमी होणार असला, तरी अनेक यंत्रणांवर या वादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Advertisement

सूर्याच्या परिमंडळातून या वादळाची निर्मिती झाली असून, त्याच्या प्रचंड वेगामुळे रेडिओ सिग्नल, विमान यंत्रणा, कम्युनिकेशनची माध्यमे आणि पावसावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यांच्या कार्यात अडथळे येण्याचा अंदाज ‘स्पेसवेदर डॉट कॉम’ या वेबसाईटने व्यक्त केला आहे.

Advertisement

या वादळामुळे उत्तर-दक्षिण ध्रुवाजवळ असणाऱ्या प्रदेशातून आकाशात पाहिल्यास पृथ्वीजवळ असणारे इतर ग्रह अधिक प्रकाशमान दिसण्याचा अंदाज आहे. वातावरणातील बदलांमुळे पुढील दोन रात्री ग्रहांचा रंग अधिक चमकदार दिसेल आणि त्यांच्याभोवती या वादळामुळे निर्माण झालेली धूळही दिसेल, असे सांगण्यात आले आहे.

Advertisement

सूर्यापासून हे वादळ तयार झालेले असल्यामुळे वेगात वाहणारे वारे अत्यंत उष्ण असतील. पृथ्वीवर उष्ण वारे आदळतील, तेव्हा पृथ्वीचेही तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्याचा विपरित परिणाम सॅलेटाईटवर झाल्यामुळे मोबाईल सेवा विस्कळित होण्याचा अंदाज आहे.

Advertisement

अवकाशात सध्या वाऱ्याचा वेग प्रचंड असला, तरी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे त्याला आवर घातला जाईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Advertisement

आयपीओ येण्याआधीच या कंपनीत सुरू झालेय राजीनामासत्र..! कंपनीवर होणार असा परिणाम..
सरप्राईज आनंद..! बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार अचानक सुटी, पाहा आरबीआयच्या आदेशात काय म्हटलंय..?
‘टेट’च्या मदतीने शिक्षक भरती झालीय ‘पवित्र’; पहा हजारोंना कशी मिळाली नियुक्ती थेट..!

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply