Take a fresh look at your lifestyle.

वर्षात लाखाचे आठ लाख..! शेअर बाजारातील या शेअरमुळे गुंतवणूकदार झालेत मालामाल..

नवी दिल्ली : कोविड-19च्या पहिल्या लाटेत शेअर बाजारात बड्या शेअर्सची धूळधाण झाल्याने गुंतवणूकदारांनी ‘स्मॉल’ आणि ‘मिड कॅप’ म्हणजेच लघू आणि मध्यम कंपन्याच्या शेअर्सकडे लक्ष वळवलं. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमी पैशात भरपूर नफा मिळवून देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Advertisement

शेअर बाजारात शेअर खरेदी किंवा विक्रीची वेळ साधण्याला महत्व असते. बऱ्याचदा दीर्घ काळ ठेवलेला शेअर्स प्रचंड नफा देतात. मात्र, अनेकदा शेअर बाजार पडला, की आपण घाबरून गुंतवणूक काढून घेताे आणि नंतर त्याचा त्यांना पश्चाताप होतो. अशाच एका शेअरने सध्या लोकांना मालामाल केले आहे. हा शेअर आहे आयटी क्षेत्रातील सुबेक्स (Subex) कंपनीचा…!

Advertisement

2021 मधल्या मल्टिबॅगर स्मॉल (Small) आणि मिड कॅप (Mid Cap) शेअर्सच्या यादीतला हा एक महत्त्वाचा शेअर ठरला आहे. ‘सुबेक्स’ने एका वर्षाच्या कालावधीत तब्बल 837.34 टक्के वाढ नोंदवून गुंतवणूकदारांना लक्षाधीश केलेय. ‘सुबेक्स’चे शेअर्स वर्षभरापूर्वी खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता लाखो रुपयांचा फायदा झाला आहे.

Advertisement

बंगळुरू स्थित ‘सुबेक्स’ या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरची किंमत 9 जुलै 2020 रोजी फक्त 7.82 रुपये इतकी होती. बरोबर वर्षभरानंतर 9 जुलै 2021 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारात, अर्थात एनएसईमध्ये (NSE) त्याची किंमत 71.20 रुपये झाली. म्हणजेच वर्षभरात या शेअरनं 800 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविलीय.

Advertisement

गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 150 टक्क्यांहून अधिक वाढला, तर मागील एका महिन्यात या कंपनीनं 22.88 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. त्यामुळे 2021मध्येही घसघशीत कमाई करून देणारा ही शेअर ठरला आहे.

Advertisement

आतापर्यंत ‘सुबेक्स’ने दिलेल्या परताव्याच्या हिशेबाने विचार केल्यास, वर्षापूर्वी गुंतवलेल्या रकमेच्या साधारण आठ पट रक्कम मिळाली आहे. म्हणजेच वर्षापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले गेले असतील, तर त्याला आता 8.37 लाख रुपये मिळतील. 6 महिन्यांपूर्वी कोणी यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आता 1.53 लाख रुपये मिळाले असते.

Advertisement

एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीला एक लाख 22 हजार रुपये मिळाले असते. म्हणजे अवघ्या महिन्याभरात त्याला 22 हजारांचा नफा झाला असता. गुंतवणूकदारांना लक्षाधीश करणाऱ्या या कंपनीचं बाजारमूल्य सध्या सुमारे 3750 कोटी रुपये आहे.

Advertisement

सरप्राईज आनंद..! बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार अचानक सुटी, पाहा आरबीआयच्या आदेशात काय म्हटलंय..?
घरबसल्या कारलोन, कार एक्सचेंजचीही सोय.. पाहा कोणत्या कंपनीने ग्राहकांसाठी आणलीय अनोखी सुविधा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply