Take a fresh look at your lifestyle.

राज्यात पावसाचा जोर वाढणार..! हवामान खात्याने काय अंदाज वर्तवलाय जाणून घेण्यासाठी वाचा..

पुणे : राज्यात जवळपास तीन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा माॅन्सूनची वापसी झाली आहे. पुढील चार दिवसांत कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) व्यक्त केला आहे.

Advertisement

कोकण, घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीही होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

Advertisement

अरबी समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे राज्याची पश्चिम किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Advertisement

उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मात्र अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट गडद होत चालले आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत.

Advertisement

अरबी समुद्रातील अनुकूल वातावरणामुळे पुढील चार-पाच दिवसात कोकण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळू शकते. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह वेगात वारे वाहण्याची शक्यता आहे.

Advertisement

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ आणि जालना जिल्ह्याना हवामान खात्यानं ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

Advertisement

मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात अंशतः कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं  विदर्भातही बहुतांशी ठिकाणी ढगांचा गडगडाट होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Advertisement

पृथ्वीच्या दिशेने येतेय महाभयंकर वादळ..! पाहा काय नुकसान होऊ शकते..?
कामाची बातमी.. टाटांची कंपनी देणार फ्रेशर तरुणांना नोकरीची संधी, वाट कसली पाहता, लागा तयारीला..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply