Take a fresh look at your lifestyle.

घरबसल्या कारलोन, कार एक्सचेंजचीही सोय.. पाहा कोणत्या कंपनीने ग्राहकांसाठी आणलीय अनोखी सुविधा..?

मुंबई : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी घरबसल्या ऑनलाइन कार लोन (Online Car Loan) उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय. ‘मारुती सुझुकी इंडिया’ने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन या देशव्यापी सुविधेची घोषणा केली. त्या माध्यमातून ग्राहकांना ‘एंड-टू-एंड ऑनलाइन कार फायनान्स’ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Advertisement

देशातली सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीने डिसेंबर- 2020मध्ये ठरावीक शहरांत ‘मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स’ सुविधा सादर केली होती. त्यानंतर आता कंपनीने अरेना (Arena) (मास मार्केट कार रिटेल चेन) आणि नेक्सा (Nexa) (प्रीमियम कार आउटलेट) या दोन्ही कारवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

Advertisement

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बॅंक, अॅक्सिस बँक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, इंडसइंड बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, महिंद्रा फायनान्स आणि सुंदरम फायनान्स यांसह 14 संस्था त्यात सहभागी झाल्या असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

कार डीलरकडे जाण्यापूर्वी बहुतांश ग्राहक कारखरेदीची प्रक्रिया ऑनलाइन सुरू करतात. त्यात कार आणि अर्थसाह्य यांचाही समावेश आहे. ग्राहकांची बदलती व्यवहारपद्धती पाहता, कंपनीने ‘मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स’ या नावाने एक ‘डिजीटल प्लॅटफॉर्म’ सुरू केला आहे.

Advertisement

त्या माध्यमातून ग्राहकांना ‘एंड-टू-एंड’ (End-To-End) ऑनलाइन कार फायनान्सचा पर्याय मिळणार असल्याचे ‘एमएसआय’चे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं.

Advertisement

मागील वर्षी ठरावीक शहरांत हा पथदर्शी प्रकल्प राबवला होता. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात 25 लाखांहून अधिक ग्राहक ‘मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स प्लॅटफॉर्म’शी जोडले गेले. 1.6 लाखांहून अधिक ग्राहकांनी ‘ऑन-रोड’ किमतीची जुळवणी ऑनलाइन केली, तर 40 हजारांहून अधिक ग्राहकांनी कर्जस्वीकृती पत्र ‘ऑनलाइन डाउनलोड’ केले.

Advertisement

ग्राहकांच्या या प्रतिसादामुळे ही सुविधा देशभरात सुरू करण्यासाठी आमचा आत्मविश्वास वाढला. अर्थसाह्य करणाऱ्या 14 संस्था आमच्या ग्राहकांना व्यक्तिगत अर्थसाह्यासाठी पर्याय उपलब्ध करून देत आहेत. ‘मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स’च्या माध्यमातून ग्राहक अर्थविषयक सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतात, तसंच ऑनलाइन कर्ज, योग्य कर्ज पुरवठादाराची निवड आणि योग्य कर्ज पर्यायाचीही निवडही करू शकतात.

Advertisement

कंपनीने कार एक्सचेंज (Car  Exchange)साठीही एक फीचर सुरू केले आहे. त्या माध्यमातून ग्राहकांना ‘एक्स्चेंज’ स्वरूपात कार खरेदी करायची असेल, तर सध्या वापरात असलेल्या कारची अंदाजे किंमत जाणून घेता येते. शिवाय या प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना सह-अर्जदार अर्थसाह्याचा पर्यायदेखील आहे. ग्राहक प्रोफाइलचे व्यापक स्पेक्ट्रम कव्हर केलं जात असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

इथे गुंतवा की पैसे, एफडीपेक्षा अधिक परतावा मिळेल, पाहा कोणती नवी योजना देतेय मोक्कार पैसा..
सोप्पंय की.. फ़क़्त ‘त्या’ भाज्या अन चहा पिऊन वजन करा कमी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply