Take a fresh look at your lifestyle.

सरप्राईज आनंद..! बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार अचानक सुटी, पाहा ‘आरबीआय’च्या आदेशात काय म्हटलंय..?

नवी दिल्ली :  बाॅसकडून सुटी किंवा रजा मिळवणे, तसे अवघड काम. मात्र, बॅंकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बॅंकेने आश्चर्याचा धक्का दिला आहे. ट्रेजरी, करन्सी चेस्टसह इतर संवेदनशील पदांवर काम करणाऱ्या बँक कर्मचार्‍यांना वर्षाला किमान 10 दिवसांची ‘सरप्राईज सुट्टी’ (Surprise Leave) देणार असल्याचे जाहीर केले आहे. शेड्यूल कमर्शियल बँकेशिवाय ग्रामीण विकास बँका, सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही रिझर्व्ह बँक इंडियाचा हा नवीन नियम लागू असणार आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

Advertisement

‘आरबीआय’ने एप्रिल 2015 मध्ये आधीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अशा प्रकारे किती सुट्ट्या दिल्या जातील, हे स्पष्ट केलेले नव्हते. मात्र, आता रिझर्व्ह बॅंकेने संवेदनशील पदांवर वा संचालन क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी अनपेक्षित रजा धोरण घेतलं असून, ते अनिवार्य केले आहे. तसेच पूर्वीचे 23 एप्रिल 2015 रोजीचे परिपत्रकही रद्द केले आहे.

Advertisement

2015च्या सर्क्युलरनुसार बँकर्स ट्रेजरी ऑपरेशन, करंन्सी चेस्ट, रिस्क मॉडलिंग, मॉडल वॅलिडेशनसारख्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासंवेदनशील मानलं जाते. RBI संवेदनशील पदांबाबत एक लिस्टही जारी करणार आहे. या लिस्टमधील कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी ‘Mandatory Leave’ अंतर्गत 10 दिवसांची सुट्टी अचानक दिली जाणार आहे.

Advertisement

बँकांना त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजूर धोरणानुसार संवेदनशील पदांची यादी तयार करण्यासाठी, तसेच वेळोवेळी यादीचा आढावा घेण्यासाठी सांगण्यात आल आहे. आरबीआयने बँकांना सहा महिन्यांत सुधारित सूचनांचे पालन करण्यास सांगितलेय.

Advertisement

ग्रामीण विकास बँका आणि सहकारी बँकांना जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांअतर्गत आरबीआयने काही सूचना केल्या आहेत. त्यात अनपेक्षित रजा देण्याचे धोरण तयार करण्यास सांगितले आहे. या सुट्टीच्या काळात कर्मचाऱ्याला अंतर्गत/कॉर्पोरेट ई-मेल वगळता प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन स्वरूपात कोणत्याही कामाची जबाबदारी दिली जाणार नाही.

Advertisement

सर्वसाधारण उद्देशाने अंतर्गत/कॉर्पोरेट ई-मेलची सुविधा बँक कर्मचार्‍यांना उपलब्ध असणार आहे. ही सुटी अचानक दिली जाणार आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना आधी कोणतीही कल्पना दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

चिनी हॅकरच्या निशाण्यावर एसबीआयचे खातेदार, बॅंकेची सेवा या काळात राहणार बंद.. पाहा नेमकं काय झालंय..
‘टेट’च्या मदतीने शिक्षक भरती झालीय ‘पवित्र’; पहा हजारोंना कशी मिळाली नियुक्ती थेट..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply