Take a fresh look at your lifestyle.

‘आयपीओ’ येण्याआधीच ‘या’ कंपनीत सुरू झालेय राजीनामासत्र..! कंपनीवर होणार असा परिणाम..

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील मोठे नाव असणाऱ्या पेटीएम (Paytm) कंपनीचा लवकरच ‘आयपीओ’ (इनिशिअल पब्लिक ऑफर) येत आहे. मात्र, तत्पूर्वीच या कंपनीत मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू झाली आहे. ही कंपनी जुलैअखेर ‘आयपीओ’साठी अर्ज करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीला राम राम करण्यास सुरवात केली आहे. पेटीएमच्या प्रेसिडंटसह अनेक वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे.

Advertisement

राजीनामा देणाऱ्यांमध्ये चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकूर यांचाही समावेश आहे. तसेच गेल्या महिन्यातच पेटीएमच्या फायनान्शिअल सर्व्हिसेस डिव्हिजनचे हेड अमित नय्यर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. नय्यर हे ऑगस्ट 2019 पासून कंपनीत कार्यरत होते. त्यांच्यावर कंपनीची मोठी जबाबदारी दिलेली होती.

Advertisement

लेंडिंग, इन्शुरन्स, डिस्ट्रीब्यूशन, वेल्थ मॅनेजमेंट आणि स्टॉक ब्रोकिंगसंबंधी कामकाज नय्यर हे पाहत होते. पेटीएमसोबत जोडले जाण्याआधी ते अॅडव्हायजरी फर्म Arpwood Capital मध्ये कार्यरत होते. तेथे त्यांच्याकडे मॅनेजमेंट डायरेक्टर पदाची जबाबदारी होती. पेटीएम बोर्डाने नय्यर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Advertisement

तसेच, कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकूर यांनीदेखील गेल्या महिन्यातच राजीनामा दिला होता. पेटीएममध्ये त्यांचा कार्यकाळ केवळ 18 दिवसांचा राहिला. पेटीएममधून राजीनामा देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये केवळ ठाकूर आणि नय्यर यांचाच समावेश नाही, तर अनेक बड्या अधिकाऱ्यांनी कंपनीला यावर्षी बाय बाय केले आहे.

Advertisement

पेटीएमच्या हेड ऑफ मार्केटिंग पदाचा फेब्रुवारीमध्ये जसकरण सिंह यांनी राजीनामा दिला होता. ते कंपनीमध्ये 6 वर्षांसाठी कार्यरत होते. पेटीएम कंपनी सोडल्यानंतर ते Xiaomi India च्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पदावर रुजू झाले आहेत.

Advertisement

कामाची बातमी.. टाटांची कंपनी देणार फ्रेशर तरुणांना नोकरीची संधी, वाट कसली पाहता, लागा तयारीला..
‘त्यांच्या’ नोकऱ्या शाबित राहणार रे.. पहा राज्य सरकारने काय केलीय महत्वाची घोषणा

Advertisement
Advertisement

Leave a Reply