Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी स्वातंत्र्यासाठी संघटना आक्रमक; निवडणूकित उतरणार आंदोलनाचे शिलेदार..!

नाशिक : युगात्मा शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी स्वातंत्र्याचा विचार दिला. आता तोच विचार पुन्हा एकदा पेटवून अवघ्या देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवडणुका लढवण्याच्या उद्देशाने शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष सक्रीय झालेले आहेत.

Advertisement

पक्षाचे प्रवक्ते भगवान बोराडे यांयासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी महाराष्ट्रात राज्यभर तयारीला सुरुवळ केली आहे. त्याबद्दल बोराडे यांनी फेसबुकवर माहिती दिली आहे. शेतकऱ्याला आर्थिक बळ मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. हेच आता एक ध्येय असून स्वतंत्र भारत पक्षाची पुनर्बांधणी आणि 2024 लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी विधानसभेवर शेतकरी संघटनेचा व स्वतंत्र भारत पक्षाचा झेंडा फडकावा म्हणून उमेदवार तयार करण्याचे काम सुद्धा सुरू असल्याचे त्यात त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, शेतकरी संघटनेचे जिद्दीचे लढाऊ कार्यकर्ते शरद जोशी यांनी हजारोच्या लाखोच्या संख्येने तयार केले. गेली सत्तर वर्षे भारत देशाला स्वातंत्र्य मिळूनही देशातील दारिद्र्य हटत नाही. याचे एकमेव कारण 70 % भारताची अर्थव्यवस्था असणारा शेतीउद्योग सरकारी धोरणामुळे तोट्यात आहे. गोरे इंग्रज गेले आणि त्यांच्या जागी या काळ्या इंग्रजांनी भारतातील शेतकऱ्यांना व जनतेलाच लुटण्याचे काम केले आहे. परिणामी देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. साऱ्या जगाला अन्नधान्य पुरवणारा शेतीउद्योग आहे. परंतु, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणमुळे आज शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पक्षात सहभागी होऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply