Take a fresh look at your lifestyle.

आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या ‘त्या’ मुद्द्यावर देशभरात चर्चा सुरू; पहा नेमक्या काय घडल्यात घडामोडी

नागपूर : देशभरात सध्या केंद्रातील सत्ताधारी भाजपा इलेक्शन मोडवर जाऊन तयारीला लागलेला असताना प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये संडोपसुंदी सुरूच आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत दिग्गज नेत्यांमध्ये असलेले वाद तर आता देशाच्या चर्चेत आलेले आहेत.

Advertisement

महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष हे पद मिळाल्यावर नाना पटोले यांनी दणक्यात काम सुरू करताना थेट स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा केली आहे. त्याचवेळी प्रशासकीय आरक्षणातील नव्या नियमामुळे पक्षाचे दुसरे दिग्गज नेते असलेल्या ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपली नाराजी वेळोवेळी दाखवून दिली आहे. तर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे या कालावधीत अर्थपूर्ण पद्धतीने शांत आहेत.

Advertisement

असे चित्र असतानाच राऊत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध तक्रार केल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. ऊर्जा खाते सोडून विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून पक्षांतर्गत दबाव आणि पटोले यांच्या कारवाया याने वैतागून राउत यांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहेत.

Advertisement

तर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीतच असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना ‘राऊत पक्षाच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यासंदर्भात ते भेटले असावेत’ असे सांगून टाकलेले आहे. पटोले यांना राहुल गांधी यांनी मंत्रिपदाचे वचन देऊनच पक्षांतर्गत बदल केले होते. आता पाटोले यांना ऊर्जामंत्री हे दमदार खाते हवे असल्याने हा वाद चालू झाला आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या काळात सोनिया गांधी पदाधिकाऱ्यांना सहसा भेटत नसतानाही राऊत यांना भेटून साेनियांनी २० मिनिटे चर्चा केल्याने पक्षातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कॉंग्रेसच्या अंतर्गत मोठा वाद असून त्यामुळे वेगळे काही घडण्याची शक्यता लक्षात घेऊन चर्चना उधान आलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply