Take a fresh look at your lifestyle.

एसबीआय जनरल इन्शुरन्सची नवी पाॅलिसी लाॅंच, ग्राहकांचा होणार फायदाच फायदा..

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे आरोग्य विमा काढणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजच्या परिस्थितीत आरोग्य विमा हा केवळ एक पर्याय नव्हे, तर गरज बनला आहे. दुसरीकडे बाजारात आरोग्य विम्याची सोय देणाऱ्या विविध कंपन्या असताना नेमकी कोणती पाॅलिसी घ्यावी, याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्याचे दिसते. आज आपण अशाच एका विमा पाॅलिसीबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो..

Advertisement

एसबीआय जनरल इन्शुरन्स ही भारतातील सध्याची आघाडीच्या विमा कंपनी आहे. या कंपनीने एक व्यापक आरोग्यविमा योजना आणलीय. त्यात ग्राहकांना संपूर्ण विमा संरक्षण मिळणार आहे. तेही अगदी 5 कोटी रुपयांपर्यंत कव्हरेज मिळेल. याव्यतिरिक्त 20 मूलभूत कव्हर्स आणि 8 पर्यायी कव्हर्स देखील उपलब्ध असणार आहेत. या नवीन योजनेत ग्राहक त्यांच्या मर्जीनुसार पॉलिसीची मुदत आणि इतर गोष्टीही निवडू शकतात.

Advertisement

‘आरोग्य सुप्रीम’ असे या आरोग्य विमा पाॅलिसीचे नाव आहे. त्यात विमा रक्कम आणि कव्हरेज सुविधांच्या आधारावर ग्राहकांनी प्रो, प्लस आणि प्रीमियम यापैकी एकाची निवड करता येणार आहे. तसेच ग्राहकांना विमा रक्कम परतफेड करण्याचा पर्याय, पुनर्प्राप्ती लाभ, अनुकंपा प्रवास असे इतर पर्यायही मिळणार आहेत. ग्राहकांना 1 ते 3 वर्षांपर्यंत पॉलिसीची मुदत निवडण्याची सुविधाही आहे.

Advertisement

आरोग्य सुप्रीम आरोग्य विमा योजनेत विमा रकमेच्या विस्तृत सुविधा ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रीमियम आणि कार्यकाळ निवडता येणार आहे. कोविडच्या उपचारात लोकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, हे लक्षात घेवून संपूर्ण पाॅलिसी तयार करण्यात आली आहे.

Advertisement

कोरोना साथीमुळे आरोग्यविमा काढणाऱ्यांची संख्या वाढल्याने 2021च्या पहिल्या तिमाहीच्या (क्यू १) च्या तुलनेत आरोग्य विमा किंमत निर्देशांकात 4.87% च्या वाढीसह क्यू 2 मध्ये मोठा बदल झाला आहे. विमा प्रीमियम किमतीच्या निर्देशांक मूल्यात 25,197 डॉलरची वाढ झालीय. आरोग्य विमा निर्देशांक मागील दोन तिमाहीत म्हणजेच Q4FY20 आणि Q1FY21 मध्ये 24,026 वर स्थिर राहिले आहेत.

Advertisement

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! माॅन्सूनचे पुनरागमन, पाहा कधीपासून सुरू होणार मुसळधार पाऊस

Advertisement

शेणापासून रंग..! गावातच आलीय मोठ्या कमाईची संधी, पाहा तुमच्या फायद्याची बातमी..

Advertisement

पावसाळा म्हणजे अनारोग्याची भीती; पहा नेमकी काय काळजी घ्यायचीय तुम्हाला

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply