Take a fresh look at your lifestyle.

चिनी हॅकरच्या निशाण्यावर एसबीआयचे खातेदार… बॅंकेची सेवा ‘या’ काळात राहणार बंद.. पाहा नेमकं काय झालंय..

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाची (SBI) सेवा 10 जुलै रोजी रात्री 10.45 ते 11 जुलै रोजी दुपारी 12.15 या वेळेदरम्यान बंद राहणार असल्याची सूचना एसबीआय बँकेने जारी केलीय.

Advertisement

मागील काही काळापासून सायबर चाेऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. त्यातही एसबीआयचे खातेदार चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर आल्याचा एक अहवाल समोर आल्यावर याबाबत मोठी दक्षता घेण्यात येत आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवरच एसबीआयने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटलेय की, 10 जुलै रोजी रात्री 10.45 ते 11 जुलै रोजी दुपारी 12.15 या वेळेत देखभाल-दुरुस्तीच्या कारणास्तव इंटरनेट बँकिंग, योनो, यूपीआय, योनो लाईट सेवा बंद राहणार आहे. खातेदारांनी त्यांची काही महत्त्वाची कामे, डिजिटल व्यवहार त्यापूर्वीच करण्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement

देशभरात एसबीआयचे 44 कोटी ग्राहक आहेत. एका अहवालानुसार, एसबीआय ग्राहकांना फिशिंगचा बळी बनवून चिनी हॅकर्स त्यांचे पैसे लुटत आहेत. हॅकर्सकडून एक दुवा ग्राहकांकडे सामायिक केला जात आहे आणि त्यानंतर त्यांना केवायसी अद्ययावत करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्या बदल्यात चतुर ग्राहकांना 50 लाखांपर्यंत गिप्ट देण्याचे आमिष दाखविले जात आहे.

Advertisement

आपल्या ग्राहकांना सायबर फसवणूक टाळण्यासाठी एसबीआय सतत सल्ला देत आहे. नियमित पासवर्ड बदलण्याचे आवाहन करीत आहे. पासवर्ड ऑनलाईन बदलणे हे विषाणूंविरुद्ध लसीसारखे काम आहे. सायबर फसवणुकीपासून स्वत: चे संरक्षण करा, असे आवाहन एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये केले आहे.

Advertisement

चिनी हॅकर्स हे एसएमएस, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधतात. त्यांच्या मेसेजमध्ये एक लिंक सामायिक केली आहे. त्यात त्यांना केवायसी अद्ययावत करण्याचा सल्ला देण्यात येतो.

Advertisement

त्या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्ता बनावट वेबसाईटवर जातो. तेथे पासवर्डसह लॉगिन करण्यास सांगितले जाते. ग्राहकाने चुकून तेथे लॉगिन केल्यास त्याच्या खात्याचा तपशील चोरी होतो. त्यामुळे अशा मेसेजपासून सावध राहण्याचा सल्ला एसबीआय बॅंकेने दिला आहे.

Advertisement

भन्नाटच की.. तब्बल १२५ देशांमध्ये आहे भारताच्या ‘त्या’ शेतमालास बंपर मागणी..!

Advertisement

इथे गुंतवा की पैसे, एफडीपेक्षा अधिक परतावा मिळेल, पाहा कोणती नवी योजना देतेय मोक्कार पैसा..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply