Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण, चांदीचीही गटांगळी, पाहा कशामुळे झालीय घसरण..?

नवी दिल्ली : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सराफ बाजारात आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीतील सुस्तीमुळे आज (शुक्रवारी) दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात 451 रुपयांची घसरण झाली. बाजार बंद होताना सोन्याचा भाव प्रति तोळ्यामागे 46,844 रुपये होता. गुरुवारी त्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47,295 रुपये होती.

Advertisement

चांदीच्या दरातही आज 559 रुपयांची (Silver latest price) घसरण होऊन 67,465 रुपये प्रति किलोवर भाव बंद झाला. गुरुवारी त्याची किंमत 68,024 रुपये प्रति किलो होती. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 7 पैशांनी वधारुन 74.64 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1802 डॉलरवर, तर चांदी 0.50 टक्क्यांच्या वाढीसह प्रति औंस 26.11 डॉलरवर व्यापार करीत होता.

Advertisement

अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्याने, सोन्याच्या किमतीत वाढ झाली. सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याची किंमत वाढली. साप्ताहिकदृष्ट्या या वेळी सोन्यात जवळपास 1 टक्क्यांची वाढ दिसल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.

Advertisement

गेल्या तीन दिवसांपासून अमेरिकन यील्ड बाँडवर जोरदार दबाव दिसत होता. अमेरिकेच्या 10 वर्षांच्या रोखे उत्पन्नात आज मोठी वाढ झाली. सध्या ते 4.51 टक्क्यांच्या वाढीसह 1.346 टक्क्यांच्या पातळीवर आहे. डॉलर निर्देशांक 0.15 टक्क्यांनी घसरून 92.263 च्या स्तरावर आहे. जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर किती मजबूत आहे, हे या निर्देशांकातून दिसते.

Advertisement

दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था कोरोनातून आता सावरत असून, ऊद्योग-व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

Advertisement

चिनी हॅकरच्या निशाण्यावर एसबीआयचे खातेदार; बॅंकेची सेवा या काळात राहणार बंद.. पाहा नेमकं काय झालंय..

Advertisement

म्हणून वाढतायेत सोनाचे भाव; पहा आज कितीने चमकलाय हा पिवळा धातू

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply