Take a fresh look at your lifestyle.

करोना रोखण्यासाठी फ़क़्त ‘तोच’ एकमेव उपाय; पहा नेमके काय म्हटलेय UNO ने

दिल्ली : गेल्या दीड वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या घातक महामारीने लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. अजूनही या आजाराने आपली पाठ सोडलेली नाही. या आजाराने जगभरात 40 लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने यावर चिंता व्यक्त केली आहे. या महामारीस रोखायचे असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जगातील देशांनी लसीकरण मोहिम आधिक वेगवान करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी केले आहे.

Advertisement

जगात आजही अनेक देश आहेत, ज्यांना अजूनही लसी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सुद्धा वायरसचा प्रसार वाढत चालला आहे. या महामारीचा नायनाट होण्यास अजून बराच वेळ लागणार आहे. यावर्षात तर निम्म्यापेक्षा जास्त संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू जितका जास्त पसरेल तितका हा आधिक घातक होऊन रुपे बदलत जाईल. आणि लसी सुद्धा यावर परिणामकारक ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

दुसरीकडे, या आजारामुळे रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने निर्बंधात सवलती देणाऱ्या देशांना कडक शब्दांत फटकारले आहे. कोरोनाने आता स्वतःचे रूप बदलत अधिक घातक होण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. डेल्टा व्हेरिएंट अतिशय घातक असून जगभरातील 98 पेक्षा जास्त देशांमध्ये फैलावला आहे. आता इंडोनेशिया या देशात डेल्टाने हाहाकार उडाला आहे.

Advertisement

या व्हेरिएंटमुळे देशात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत. तसेच मृयूंच्या संख्येत सुद्धा कमालीची वाढ झाली आहे. या देशात गेल्या दोन ते तीन आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या परिस्थिती इतकी भीषण आहे की प्लास्टिकचे तंबू तयार करून आयसीयू तयार केले आहेत. आणि येथे कोरोना संक्रमित रुग्णांचे उपचार सुरू आहेत. फुटपाथवर ऑक्सिजन टॅंक ठेवले आहेत. कोरोनामुळे देशात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच खराब होत आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड १९ च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले होते.

Advertisement

Advertisement

Leave a Reply