Take a fresh look at your lifestyle.

आय्योव.. बसला की झटका; पण तरी हीसुद्धा आहेच की गुड न्यूज

दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात काही दिवसांपासून वाढ होत आहे. आज मात्र दरवाढीचा हा ट्रेंड बदलला आहे. आज कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर 200 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीच्या दरात सुद्धा मोठी घसरण झाली आहे. चांदीचे दर जवळपास 545 रुपयांनी कमी झाले आहेत. याआधी सोन्याच्या दरात चांगली वाढ नोंदवण्यात येत होती. मागील दोनच दिवसात जवळपास 600 रुपयांनी दर वाढल होते. सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव 47 हजार 707 रुपये असा आहे. यामध्ये 203 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा सध्याचा दर 68 हजार 820 रुपये असा आहे. आज चांदीचे दर बरेच कमी झाले आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

त्यानंतर काही दिवसांपासून सोन्याचे दर पुन्हा वाढत होते. आता मात्र या दरवाढीस गुरुवारी ब्रेक लागला आहे. गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज गुरूवारी राजधानी दिल्ली शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 560 रुपये तर 24 कॅरेटसाठी 50 हजार 560 रुपये असा होता. कोलकाता मध्ये 22 कॅरेटसाठी 47 हजार 060 रुपये तर 24 कॅरेटसाठी 49 हजार 760 प्रति दहा ग्रॅम असा आहे. मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 760 रुपये तर 24 कॅरेटसाठी 47 हजार 760 रुपये असा भाव आहे. चेन्नई शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 250 रुपये असे नवीन दर आहेत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply