Take a fresh look at your lifestyle.

शेणापासून रंग..! गावातच आलीय मोठ्या कमाईची संधी, पाहा तुमच्या फायद्याची बातमी..

नवी दिल्ली : खादी ग्रामोद्योग आयोगाने गायीच्या शेणापासून रंग तयार केले आहेत. हा रंग इकोफ्रेंडली, विषरहित आहे. भारतीय प्रमाणीकरण संस्थेने शेणापासून बनविलेल्या या रंगाला प्रमाणित केलं आहे. जयपूर येथील कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इनस्टिट्यूटने या रंगाचे पेटंट मिळवले आहे. शेणात शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम याचा वापर रंग तयार करण्यासाठी केला आहे.

Advertisement

केंद्रिय ऊद्याेग मंत्री नितीन गडकरी यांनी 12 जानेवारी 2021 रोजी त्याचे लाॅचिंग केले होते. खादी प्राकृतिक पेंटच्या प्रसारासाठी आपण सदिच्छादूत (Brand Ambassador) म्हणून काम करणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले होते. देशभरात या वेदिक पेंटच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, युवा उद्योजकांना या व्यवसायात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले होते.

Advertisement

जयपूरमध्ये शेणापासून रंग तयार करण्याच्या स्वयंचलित यंत्राचे उद्घाटन नुकतेच गडकरी यांच्या हस्ते झाले. शेणापासून वेगवेगळे रंग बनविण्यासाठी एक प्लांट उभारण्यासाठी सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च येतो. त्या माध्यमातून रोजगारनिर्मिती झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केलाय..

Advertisement

सध्या बाजारात पर्यावरणस्नेही रंगाला मोठी मागणी वाढली आहे. जयपूरमध्ये हे रंग तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणासाठीही अनेक जण इच्छूक असून, 350 जण प्रतीक्षायादीत असल्याचे समजले. हे प्रशिक्षण 7 दिवसांचे असते. आगामी काळात प्रशिक्षण सुविधा वाढविणार असून, त्यानंतर गावाेगाव लोक शेणापासून रंग बनविण्याची कंपनी स्थापन करु शकतील, असे गडकरी यांनी सांगितले.

Advertisement

शेणापासून तयार करण्यात आलेल्या रंगाची विक्री वाढल्यानंतर गावामध्ये शेणाची खरेदी केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 30 हजार रुपये शेणाच्या विक्रीतून मिळतील. सध्या शेतकरी शेणाचा खत म्हणून वापर करतात. मात्र, रंगाच्या कंपन्या निर्माण झाल्यास हे चित्र बदलणार असल्याचे गडकरी म्हणाले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply