Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या ढिसाळ कारभारामुळेच ‘हे’ घडले; पहा कॉंग्रेस पक्षाने नेमका काय केलाय आरोप

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आता देशातील विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसनेही मोदी सरकारवर टीका करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा. कारण, मोदी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Advertisement

इंधन दरवाढी विरोधात सध्या काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होत आहे. आज पटोले यांच्या उपस्थितीत नागपूर शहरात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकावर घणाघाती टीका केली. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन देण्यात आले. चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला. देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. कोरोनामुळे देशात अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. मोदींच्या ढिसाळ कारभारामुळेच हे घडले आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदी यांनीच राजीनामा द्यायला पाहिजे, असे पटोले यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, देशातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढी विरोधात आज काँग्रेसने मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. आज राज्यात ठिकठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाढती महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

दरम्यान, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत, त्यामुळेच तर मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे, डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. विरोधक या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राजकीय पक्षानंतर आता शेतकरी आंदोलनातील नेते सुद्धा मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अखिल भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती.

Advertisement

Advertisement

Leave a Reply