Take a fresh look at your lifestyle.

‘मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे नाटक..!’; पहा नेमका कोणी हाणलाय मोदी सरकारला टोला..!

दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर देशातील विरोधक जोरदार टीका करत आहेत. राजकीय पक्षांनी तर सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर अन्य क्षेत्रांतूनही केंद्र सरकारच्या कारभारावर आता टीका होत आहे. यावेळी केंद्र सरकारने मंत्रिमंडळात जवळपास 43 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काही जुन्या आणि अनुभवी मंत्र्यांना राजीनामाही द्यावा लागला आहे. यानंतर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसने तर कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने पंतप्रधान मोदी यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर, नुसते डबे बदलून काहीच उपयोग होणार नाही तर आता पूर्ण रेल्वेच बदलणे गरजेचे आहे, अशी टीका समाजवादी पार्टीने केली आहे.

Advertisement

त्यानंतर आता निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी सुद्धा या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाची मोठी चर्चा होत आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे. मात्र, प्रत्यक्षात काय आहे, यामुळे सामान्य जनतेच्या जीवनात काही सुधारणा होणार आहे का, लोकांना चांगले आयुष्य मिळणार आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नांचे उत्तर नाही असेच आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हे सुद्धा एक नाटक आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

Advertisement

दरम्यान, देशात आज इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट, पुढील काही दिवसात दर कमी होणार नाही असे संकेत सरकारने दिले आहेत. केंद्रीय मंत्रीच तसे सांगत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटले आहे. आरोग्यावरील खर्च वाढला आहे. तसेच या काळात केंद्र सरकार अनेक जन कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांसाठी सुद्धा मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सध्या इंधनाच्या दर कमी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर आता काँग्रेसने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलना दरम्यान काँग्रेस नेते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही टीका करत आहेत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply