Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार विकणार खनिज क्षेत्रातील ‘या’ कंपनीतील भागीदारी, गुंतवणूकदारांसाठी आलीय मोठी संधी, जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत आली असून, निधी उभारण्यासाठी मोदी सरकारने खासगी क्षेत्रातील भागीदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी बँकांपाठोपाठ मोदी सरकारने खनिज क्षेत्रातील NMDC या कंपनीतील आपली भागीदारीही विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भांडवली बाजारात या कंपनीच्या समभागाचा भाव वधारण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात काल (मंगळवारी) NMDC च्या 7 टक्के समभागविक्रीच्या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

Advertisement

आतापर्यंत NMDC च्या समभागांसाठी फक्त संस्थात्मक गुंतवणुकदारांना बोली लावता येत होती. मात्र, आता सामान्य गुंतवणुकदारांसाठीही ही समभाग विक्री खुली झाली आहे. या समभागांचे किमान मूल्य 165 रुपये निश्चित करण्यात आले आहे. केंद्र सरकार या कंपनीतील 7.49 टक्के हिस्सेदारी, म्हणजे 21.95 कोटी समभागांची विक्री करणार आहे. त्या माध्यमातून केंद्र सरकारला सुमारे 3700 कोटींचा निधी मिळण्याचा अंदाज आहे. आज (बुधवारी) NMDC च्या समभागाची किंमत 3.22 टक्क्यांनी घसरुन 169.65 रुपये झाली.

Advertisement

मोदी सरकारने LIC तील हिस्सेदारी विकण्याच्याही हालचाली सुरु केल्या आहेत. एलआयसीच्या प्रारंभिक खुली भागविक्रीला (IPO) या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमडळाची मंजुरी मिळू शकते. जानेवारी 2022 पर्यंत एलआयसीतील काही हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा मानस आहे.

Advertisement

दरम्यान, आयडीबीआय बँकेच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने कायदेशीर आणि व्यावहारिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने आता केंद्राने आयडीबीआय निर्गुंतवणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply