Take a fresh look at your lifestyle.

भाजपने ‘तो’ नैतिक अधिकार आता गमावलाय; पहा नेमकी काय टीका केलीय यादवांनी

दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आता देशातील विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळात यावेळी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर, दुसरीकडे अनेक अनुभवी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. विरोधी पक्षांनी मात्र केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने मोदी सरकारवर आरोप केले आहेत.

Advertisement

मोठ्या संख्येने मंत्री किंवा मंत्रालय बदलल्यामुळे सत्ताधारी भाजपने स्वतःच मान्य केले आहे, की ते प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे काही डबे बदलून उपयोग होणार नाही तर पूर्ण रेल्वेच बदलावी लागणार आहे. भाजपने सरकार चालवण्याचा नैतिक अधिकार आता गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली.पुढील वर्षात उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांचा विचार करुन भाजपने या राज्यातून सात जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतले आहे. त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्ष अस्वस्थ झाले आहेत. मोदी सरकारवर टीका करत आहेत.

Advertisement

यादव यांनी याआधी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकावर अनेक आरोप केले आहेत. राज्य सरकावर टीका करताना काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हटले होते, की आज राज्यात लोकांना लसींची आवश्यकता आहे मात्र सरकार लोकांचे लसीकरण करण्यात अपयशी ठरत आहे. लसींचे नियोजन पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे तरीसुद्धा रोजगार, कोविड 19, अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा का घेतला जात नाही, गुंतवणुकीबाबत जी आश्वासने दिली होती, त्याचे काय, गंगा नदीच्या साफसफाईचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असे सवाल यादव यांनी यावेळी उपस्थित केले.

Advertisement

राज्यतील जनता अजूनही स्वस्त दरात वीज पुरवठा केव्हा होईल, याची वाट पाहत आहे. या सरकारने राज्यातील दवाखान्याची अवस्था अतिशय खराब करून टाकली आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी स्विस बँकेतील जमा पैशांच्या मुद्द्यावर सरकारवर गंभीर आरोप केले होते. भाजप सरकारच्या शासन काळात झालेल्या घोटाळ्यांमुळे विदेशात जमा असल्येल्या काळ्या पैशात वाढ झाली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला होता.

Advertisement

भाजप सरकारमध्ये विकासाची कामे नाहीतच. या सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांमुळेच विदेशात जमा असलेल्या काळ्या पैशात वाढ झाली, आणि देशाचा जीडीपी मात्र घटत गेला. जनतेचा विश्वास गमावलेल्या भाजपने आता घोटाळ्यांद्वारे कमाई करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करणार नाही, असा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा सुध्दा पोकळ असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्य सरकारच्या अनेक योजनांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यादव यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

Advertisement

भाजप सरकारच्या काळात नागरिक त्रस्त आहेत आणि कायदा सुव्यवस्था ध्वस्त आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वासही आता असे वाटत आहे, की आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होणार आहे, आणि समाजवादी पार्टीचे सरकार राज्यात येणार आहे, असा दावा त्यांनी केला होता.

Advertisement

विजेच्या संकटापुढे अवघे राज्य झालेय हतबल; पहा काय ओढवली आहे परिस्थिती..!

Advertisement

UGC चा अजब फतवा; देशभरातून संतप्त प्रतिक्रिया; पहा नेमका काय आहे आदेश?

Advertisement
Advertisement

Leave a Reply