Take a fresh look at your lifestyle.

मॉन्सून अंदाज : लागा की तयारीला; पहा पावसाबद्दल नेमके काय आहे भाकीत

नाशिक : सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या आरोपांचा पाऊस आणि करोना लसटंचाईचा दुष्काळ आहे. अशावेळी शेतकऱ्यांसह एकूणच अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा घटक असलेल्या मॉन्सूनच्या पावसाने दडी मारलेली आहे. अशावेळी आता नेमके पुढचे चित्र काय असणार आणि शेतीतून यंदा नफा कसा मिळणार याचे कोडे शेतकऱ्यांना पडले आहे. दरम्यान, हवामान विभागाने आपला अंदाज व्यक्त करून दिलासा दिला आहे.

Advertisement

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हा अंदाज खरा ठरो अशीच भावना शेतकऱ्यांची आहे. अनुकूल स्थितीअभावी गेल्या १९ दिवसांपासून वायव्य भारताच्या सीमेवर रखडलेला मान्सून गुरुवारपासून (दि. ८ जुलै) सक्रिय होण्याची शक्यता आहे. १५ दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने १५ जिल्ह्यांत पावसाची तूट असून दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे अवघा महाराष्ट्र पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे.

Advertisement

दि. ८ ते ११ जुलैदरम्यान पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल असाही अंदाज आहे. एकूणच पुढील चार दिवसात अनेक भागाला या पावसाने दिलासा मिळेल आणि शेतीचे सध्याचे काही प्रश्न सुटतील असेच चित्र आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply