Take a fresh look at your lifestyle.

विजेच्या संकटापुढे अवघे राज्य झालेय हतबल; पहा काय ओढवली आहे परिस्थिती..!

चंडीगढ : देशात सुरुवातीला जोरदार बरसल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. सध्या देशात बिहार राज्य वगळता जवळपास सर्वच राज्यात पावासाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील बहुतेक राज्यात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. या राज्यात विजेचे अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे. पाऊस नाही त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे.

Advertisement

पंजाब राज्यात सरकारी आणि खासगी कार्यालये, उद्योग तसेच कंपन्यांना कमी वीज वापरण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. हरयाणा राज्याने तर थेट दुसऱ्या राज्यांना उधार दिलेली वीज पुन्हा घेण्यास सुरुवात केली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षार राज्यात विजेच्या वापरात 40 टक्के तर मागणीत 32 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे. अशा परिस्थितीत आता राज्य सरकारने अन्य राज्यांना दिलेली वीज पुन्हा घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक दिवशी 250 मेगावाट प्रमाणे वीज परत घेण्यात येत आहे. राज्यात मागील तीन दिवसांपासून दररोज तीन कोटी युनिट वीजपुरवठा केला जात आहे. यावरून सहज अंदाज येईल की आज राज्यात किती प्रमाणात विजेची मागणी वाढली आहे.
सध्या राज्याकडे 12 हजार 187 मेगावाट पेक्षा जास्त वीज उत्पादन करण्याची क्षमता आहे. अशा वेळी दररोज साधारण 26 कोटी युनिट वीज पुरवठा केला जाऊ शकतो.

Advertisement

हरयाणा प्रमाणेच पंजाब मध्ये सुद्धा विजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. सध्या या राज्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातुलनेत उत्पादन मात्र कमी होत आहे. मागणीच्या प्रमाणात वीज पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. उत्तर भारतातील राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब राज्यात तर कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. पंजाब राज्यात सुद्धा विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 9 वर्षात जवळपास 250 लाख युनिट कमी विजेचे उत्पादन झाले आहे. तर दुसरीकडे पाऊस होत नसल्याने विजेच्या मागणीत मात्र वाढ झाली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply