Take a fresh look at your lifestyle.

करोनालढ्यासाठी महाराष्ट्र आहे सज्ज; पहा नेमक्या काय सूचना केल्यात मुख्यमंत्री ठाकरेंनी

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत असताना आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसरी लाट टाळता येणे सुद्धा अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेत राज्यांनी नियोजनास सुरुवात केली आहे. राज्य सरकारनेही पूर्व तयारीस सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. संभाव्य तिसऱ्या लाटेचा अर्थचक्रावर कोणताही परिणाम होणार नाही, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Advertisement

प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या उद्योगपतींची बैठक घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरू ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करावे. कामगारांच्या राहण्याची व्यवस्था कंपनीच्या आवारात करणे शक्य असेल तर तसे नियोजन करावे. आणि असे शक्य नसेल तर कंपनीच्या आसपास परिसरात जागेचा शोध घेऊन तेथे कामगारांच्या तात्पुरच्या निवासाची व्यवस्था करावी. कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही. त्यामुळे कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत, याची काळजी घेण्यात यावी.

Advertisement

कोविड संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेस सामोरे जाताना किती औषधे, ऑक्सिजन आवश्यक आहे, याचे नियोजन करा. दररोज 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दीष्ट पूर्णत्वास नेताना राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता वेगाने वाढवावी. राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्ण करावी. जुलैअखेर पर्यंत मंजुरी दिलेले ऑक्सिजन प्रकल्प उभे राहतील याकडे लक्ष द्यावे, अशा महत्वाच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

Advertisement

मुख्यमंत्री ठाकरे यांनी याआधी कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने महत्वाचे आदेश दिले होते. देशात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. लाट कधी येईल याबाबत निश्चित माहिती नसली नाही. काही तज्ञ ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येणार असल्याचे सांगत आहेत तर काहींच्या मते नोव्हेंबरमध्ये येऊ शकते. ते काही असले तरी राज्यांनी नियोजन सुरू केले आहे.कोविड संसर्ग पाहता राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरता स्वरूपात आरोग्य सुविधा सुरू केल्या आहेत. याबाबत आराखडा तयार करावा. आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधा आणि आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी तरतूद करावी, अशा काही महत्वाच्या सूचना त्यांनी आढावा बैठकीत दिल्या होत्या.

Advertisement

दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply