Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वाढतायेत सोनाचे भाव; पहा आज कितीने चमकलाय हा पिवळा धातू

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात काही दिवसांपासून वाढ होत आहे. आज बुधवारीसुद्धा हा ट्रेंड कायम आहे. आज कमॉडिटी बाजारात सोन्याच्या दरात 200 रुपये वाढ नोंदवण्यात आली. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अनेक देशात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणुकीस प्राधान्य दिले आहे. जागतिक बाजारात सुद्धा अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर वाढताना दिसत आहेत.

Advertisement

सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव 47 हजार 885 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. यामध्ये जवळपास 201 रुपये वाढ झाली आहे. याआधी मंगळवारी ३६७ रुपये वाढ नोंदवण्यात आली होती. सध्या एक किलो चांदीचा दर 70035 रुपये असा आहे. यामध्ये सुद्धा 523 रुपये वाढ झाली आहे.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

त्यानंतर काही दिवसांपासून सोन्याचे दर पुन्हा वाढत आहेत. गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज बुधवारी राजधानी दिल्ली शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 560 रुपये तर 24 कॅरेटसाठी 50 हजार 560 रुपये असा होता. कोलकाता मध्ये 22 कॅरेटसाठी 47 हजार 60 रुपये तर 24 कॅरेटसाठी 49 हजार 760 प्रति दहा ग्रॅम असा आहे. मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 760 रुपये तर 24 कॅरेटसाठी 47 हजार 760 रुपये असा भाव आहे. चेन्नई शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 250 रुपये असे नवीन दर आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply