Take a fresh look at your lifestyle.

‘मोदी सरकार त्यावर चालते..’; पहा नेमके काय म्हटलेय काँग्रेस पक्षाने

दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर काही केल्या कमी होण्यास तयार नाही. इंधन दरवाढीचा लोकांनी सुद्धा चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी करण्याची मागणी होत आहे. मात्र, पेट्रोलियम कंपन्या कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत. केंद्र सरकारने सुद्धा याबाबत काहीच विचार केलेला नाही. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारच्याा या धोरणावर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटमध्ये नागरिकांना उद्देशून म्हटले आहे, की तुमची वाहने पेट्रोल-डिझेलवर चालत असतील पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकावर टीका केली आहे. तसेच आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या. दिल्लीत पेट्रोलची किंमत 100.21 रुपये आहे तर डिझेल 89.53 रुपयांवर पोहोचले आहे, अशी एक बातमी त्यांनी ट्विट केली आहे. या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे

Advertisement

दुसरीकडे मात्र केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करण्यास तयार नाहीत. मंत्री सुद्धा सध्याच्या परिस्थितीत दर कमी होण्याची शक्यता नाही, असे सांगत आहेत. तर सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळी इंधन दरवाढीस काँग्रेसलाच जबाबदार धरत आहे. देशात आज इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट, पुढील काही दिवसात दर कमी होणार नाही असे संकेत सरकारने दिले आहेत. केंद्रीय मंत्रीच तसे सांगत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटले आहे. आरोग्यावरील खर्च वाढला आहे. तसेच या काळात केंद्र सरकार अनेक जन कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांसाठी सुद्धा मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सध्या इंधनाच्या दर कमी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी भाजप खासदार आणि पूर्व मंत्री महेश शर्मा यांनी इंधनाच्या दरवाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून केंद्र सरकारने करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शर्मा यांनी इंधन दरवाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. याआधीच्या काँग्रेस सरकारांच्या धोरणांमुळेच आज देशात इंधनाच्या किमती वाढत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. आज इंधनाच्या दरात जी वाढ होत आहे त्यास आमचे सरकार जबाबदार नाही तर आधीचे काँग्रेस सरकार जबाबदार आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय किंमत निर्देशांका बरोबर जोडल्या होत्या. त्यामुळे आता या किमती कोणत्याही सरकारच्या नियंत्रणात राहिलेल्या नाहीत. काँग्रेस सरकारने जे धोरण बनवले होते त्यामुळेच आज इंधनाचे दर वाढत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply