Take a fresh look at your lifestyle.

आता काँग्रेसही उतरतेय आंदोलनाच्या आखाड्यात; पहा कोणत्या मुद्द्यावर झालेत आक्रमक

मुंबई : देशात सातत्याने वाढत जाणाऱ्या महागाई विरोधात विरोधी पक्षांना आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर काँग्रेससुद्धा उद्या गुरुवारपासून राज्यभरात आंदोलन करणार आहे. देशात सध्या पेट्रोल-डिझेल, डाळी, खाद्यतेल, एलपीजी गॅस या सगळ्यांच्याच किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सरकार मात्र दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने पुन्हा राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला आहे.

Advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून सरकारने देशातील गरीब लोकांची फसवणूक केली. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले. आणि आता ८५० रुपयांचे गॅस टाकी खरेदी करणे या लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. आपल्या शेजारच्या देशांत पेट्रोल अगदीच कमी दरात मिळते. मात्र, आपल्या देशात पेट्रोलसाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. या इंधन दरवाढीमुळे अन्य वस्तूंच्याही किमती वाढल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष दहा दिवस राज्यात आंदोलन करणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

Advertisement

सायकल रॅली, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने, पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबवण्यात येणार आहे. अशा पद्धतीने आंदोलन करुन केंद्र सरकारच्या कारभाराचा निषेध केला जाणार आहे.

Advertisement

दरम्यान, देशात कोरोना संकटाच्या पाठोपाठ महागाईचे संकट आले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर तर रोजच वाढत चालले आहेत. या दरवाढीमुळे देशांतर्गत महागाईत सुद्धा वाढ झाली आहे. खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यानंतर नागरिकांना आणखी झटका बसला आहे. 1 जुलैपासून घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 25.5 रुपये वाढ करण्यात आली आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने गॅस टाकीचे दर वाढणार असल्याचा अंदाज होताच. त्यानुसार तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. या दरवाढीमुळे आधीच वाढत असलेल्या महागाईत आणखी वाढ झाली आहे.

Advertisement

या दरवाढीचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. विरोधक सुद्धा केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने देशभरात आंदोलन केले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आंदोलनाचा मार्ग स्वीकारत राज्यव्यापी आंदोलन केले. त्यानंतर आता परत काँग्रेस आंदोलन करणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply