Take a fresh look at your lifestyle.

प्रीतम मुंडे यांच्याबाबताच्या बातमीबद्दल पंकजाताईंनी म्हटलेय ‘असे’; पहा मंत्रिपद मिळणार की नाही

 

Advertisement

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने कोणाला संधी मिळणार याबाबतच्या वावड्या जोरात उठत आहेत. दरम्यान, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या बातम्या येत असतानाच त्या दिल्लीला रवाना झाल्याच्या बातम्या आल्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत.. मुंडे गट म्हणजे एक प्रभावी गट असे समीकरण होते. मात्र, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर समीकरण बिघडले आहे. भाजपने या गटाच्या नेतृत्वाची विशेष दखल घ्यावी अशी अनेकांची इच्छा आहे. अशावेळी या मंत्रिमंडळ विस्तारत खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव पुढे आल्याने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. दरम्यान, अशी बातमी आलेल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply