Take a fresh look at your lifestyle.

मुंडे गटाचा भ्रमनिरास; पहा प्रीतमताईंना संधी न मिळाल्याने काय म्हटलेय समर्थकांनी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने कोणाला संधी मिळणार याबाबतच्या वावड्या जोरात उठत असतानाच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, त्या अजूनही मुंबईत असल्याचा खुलासा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्यावर समर्थक खवळले आहेत.

Advertisement

पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत.. मुंडे गट म्हणजे एक प्रभावी गट असे समीकरण होते. मात्र, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर समीकरण बिघडले आहे. भाजपने या गटाच्या नेतृत्वाची विशेष दखल घ्यावी अशी अनेकांची इच्छा आहे. अशावेळी या मंत्रिमंडळ विस्तारत खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव पुढे आल्याने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. दरम्यान, अशी बातमी आलेल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.

Advertisement

‘प्रितम ताईला मंत्रिपदाची संधी न देता एकप्रकारे मोदीजीनी OBC समाजाचा आणि मुंडे साहेबांचा अपमान केला आहे. संघाला कधीच मुंडे साहेब नको होते हे पुन्हा एकदा सिद्ध,’ असे धनराज सोळंके यांनी म्हटले आहे. तर, पंकज चीलाप म्हणतात की, ‘दिवंगत महाजन, मुंडे साहेब यांच्या मुळेच महाराष्ट्रात शिवसेनेच्या जीवावर भाजप काय ती वाढली, आज ती माणस गेली त्या मुळे तुमची किंमत तुमच्याच पक्षाने ही केली. संपूर्ण पक्ष प्रदक्षिणा घालून भाजपात दाखल झालेले नारायण मात्र दिल्लीत ते सुद्धा पंतप्रधानांच्या घरी.’ यासह सुहास मुंढे लिहितात की, ताई साहेब जेव्हा पक्षाला तुमची व ओबीसी समाजाची गरज असते तेव्हा पक्ष तुम्हाला पुढे करतो हे परत एकदा सिद्ध झाल आहे . भारतीय जनता पार्टी परत एकदा ओबीसी समाजाच्या भावनेशी खेळत आहे.

Advertisement

विशाल पांचाळ म्हणालेत की, ताईसाहेब, प्रीतमताई साहेबांना केंद्रीय मंत्रिपद असायला पाहिजे. ताईसाहेब तुम्ही दोन्ही बहिणी आमच्या पालनहार आहात. आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ पद आहातच, पण असंख्य व्यक्तीच्या हृदयातील केंद्रीय मंत्री पदाच्या उमेदवार प्रीतम ताई साहेब आहेत, हे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेच. तर, गुलाब डोंगरे लिहितात की, परत एकदा साहेबांन सारखीच वेळ आज आपल्या ताई वर आली एक निष्ठ मानसांना डावलायच आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना मंत्रिपद द्यायचं आज असं वाटतंय ढसा ढसा रडाव तुमच्या गळ्याला पडून. यासह गणेश डोंगरे यांनी म्हटलेय की, आदरणीय ताईसाहेब आपल्या प्रीतमताई यांना मंत्रीपद मिळायलाचं पाहिजे होते त्यांची काम करण्याची पध्दत तसेच लोकप्रतिनिधी कसे आणी काय असतात हे ताईंकडून शिकण्यासारखं आहेत..

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply