Take a fresh look at your lifestyle.

इम्रान खानांच्या पाकिस्तानवर कोसळले ‘हे’ही संकट; पहा काय ओढवली परिस्थिती

दिल्ली : दहशतवादास कायमच खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे ग्रह सध्या फिरले आहेत. कारण, या देशात रोजच नवे संकट येत आहे. कोरोना महामारी आणि महागाईचे संकट असताना पाण्याच्या टंचाईमुळे देशात भीषण दुष्काळ पडण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांचा हा इशारा खरा ठरतोय की काय, असेच आता या देशातील परिस्थितीवरुन दिसत आहे. पाकिस्तान मधील सिंध प्रांतात फक्त दहा दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा प्रांत वेगाने दुष्काळाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Advertisement

या प्रांतात पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे पाण्याची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. पिण्यासाठी सुद्धा येथे पाणी शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे सिंध प्रांतात पुढील काही दिवसात परिस्थिती आधिकच खराब होऊ शकते, प्रांतातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या तडाख्यात सापडू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे पाण्यावरुन येथे वादही सुरू झाले आहेत. बलूचिस्तान सरकारने सिंध सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे, की बलूचिस्तानच्या वाट्याचे पाणी सिंध सरकारने कोणत्याही परिस्थितीत रोखू नये, जर पाण्यात कपात केली तर कराची शहरास होणारा पाणी पुरवठा बंद केला जाईल, असा इशारही बलूचिस्तान सरकारने दिला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रांतात आता पाण्यामुळे भांडणे सुरू झाली आहेत.

Advertisement

दरम्यान, पाकिस्तानमध्ये पाण्याच्या संकटावर लवकरच मार्ग काढला नाही तर भीषण दुष्काळ पडेल असा इशारा जलतज्ज्ञांनी दिला होता. हा इशारा आता खरा ठरत आहे. एका रिपोर्ट मध्ये असे म्हटले होते, की दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात पिकांसाठी पुरेसे पाणी सुद्धा मिळत नाही. यावेळी जवळपास 45 टक्के पाण्याची कमतरता असते. आज देशातील अनेक मोठ्या शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे जल तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे, की आगामी काळात जर नवीन जलाशय तयार केले नाहीत आणि पाण्याचा अपव्यय टाळला गेला नाही तर देशात भीषण दुष्काळ निर्माण होण्याचा धोका आहे.
देशाची वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल आणि पाण्याचा अपव्यय या काही महत्वाच्या समस्या आहेत, आगामी काळात याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असून जर सतर्क राहिलो नाही दुष्काळाच्या संकटास कोणीही रोखू शकत नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply