Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कंपन्यांवर गडकरी भडकले; पहा नेमके काय सुनावलेय त्यांनी

दिल्ली : नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. मात्र, या महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या देशातील दिग्गज कार कंपन्यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कडक शब्दांत फटकारले आहे. देशात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी वाहन उत्पादकांनी त्यांची गुणवत्या व मानके यात सुधारणा करावी, असे गडकरी यांनी सांगितले.

Advertisement

देशातील वाहन उद्योगात ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर्सचा (ओईएम) मोठा वाटा आहे. मात्र, त्यांची कामगिरी अतिशय खराब आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते विकासाच्या सर्व टप्प्यांवर सेफ्टी ऑडीट करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही नवीन किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरू करायची असेल तर आधी त्या संबंधित मार्गाचे सुरक्षा ऑडीट करावे लागणार आहे, असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Advertisement

दरम्यान, याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीस आता इथेनॉल हाच एकमेव पर्याय असल्याचे गडकरी यांनी सांगितले होते. देशात इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. देशात इंधनाच्या किमती खूपच वाढल्या आहेत. या किमती कमी करुन नागरिकांना दिलासा देणेही आवश्यक आहे. अमेरिका, कॅनडा आणि ब्राझील यांसारख्या देशात वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी मिश्र इंधनाचा पर्याय असणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. या वाहनांंमध्ये १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के बायो इथेनॉलचा पर्याय देण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. सन २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत नेणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यामुळे इंधनाचे दर कमी होतील, असे सांगण्यात आले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply