Take a fresh look at your lifestyle.

पंकजा मुंडेंना झटका; अखेर डॉ. कराड यांना संधी देऊन साधले ‘असे’ समीकरण..!

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात अखेर बीडच्या खासदार आणि दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान मिळालेले नाही. डॉ. मुंडे यांना डावलताना भाजपने मराठवाडा आणि ओबीसी समाजाचा सत्तासमतोल साधताना मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष व औरंगाबादचे माजी महापौर व विद्यमान राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांना संधी दिली आहे.

Advertisement

Advertisement

डॉ. भागवत कराड हे दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात असले तरी पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना डावलले जाण्याचा जसा इतिहास आहे तसाच हा प्रकार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. यावर गुलाब डोंगरे यांनी म्हटले आहे की, परत एकदा साहेबांसारखीच वेळ आज आपल्या ताईवर आली. एकनिष्ठ मानसांना डावलायचे आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना मंत्रिपद द्यायचं. आज असं वाटतंय ढसा ढसा रडाव तुमच्या गळ्याला पडून. त्यांच्यासह अनेकांनी यानिमित्ताने आपली भावना सोशल मीडियामध्ये व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply