Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून सरकारला आलेत अच्छे दिन; पहा कशामुळे तिजोरी झाली मालामाल..!

दिल्ली : कोरोना काळातही केंद्र सरकारने जीएसटी संकलनाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. यावेळी मात्र उत्पन्नात काहीस घटले आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात 92 हजार 849 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. याआधी मे महिन्यात जीएसटी संकलनाच्या माध्यमातून 1 लाख 2 हजार 709 लाख कोटी रुपये मिळाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम यावेळी जीएसटी संकलनावरही पडल्याचे दिसत आहे.

Advertisement

92,849 कोटी रुपये जीएसटी संकलनातून मिळाले. यामध्ये 16,424 कोटी रुपये सीजीएसटी, 20,397 कोटी रुपये एसजीएसटी, 40,079 कोटी रुपये आयजीएसटी आणि 6,949 कोटी रुपये सेसचा समावेश आहे. कोरोनाच्या संकटात देशात अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. संकटांची यादी सुद्धा मोठी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला आहे. तरी देखील सरकारच्या उत्पन्नात मात्र फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. जीएसटी संकलनातही सरकारने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. मागील काही महिन्यांच्या तुलनेत मात्र जून महिन्यात जीएसटी संकलन थोडे कमी झाले आहे. त्यानंतर आता निर्यातीच्या क्षेत्रातही जोरदार कामगिरी केली आहे.

Advertisement

कोरोना काळात देशातील उद्योग व्यवसायांनाही फटका बसला आहे. मात्र तरीसुद्धा कामगिरीत सातत्य ठेवल्याने देशाने निर्यातीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल 95 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6 लाख 93 हजार 500 कोटी रुपये इतकी निर्यात झाली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतची ही सर्वाधिक निर्यातीचा आकडा आहे. मागील 2020-21 च्या पहिल्या तिमाहीतील निर्यातीपेक्षा यावेळची निर्यात 85 टक्के जास्त आहे. तसेच 2019-20 च्या पहिल्या तिमाहीतील निर्यातीपेक्षा 18 टक्के जास्त आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली. 2021-22 या वर्षात 400 अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दीष्ट सरकारने निश्चित केले आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

कामगारांची जास्त संख्या असलेल्या अनेक क्षेत्रांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील वस्तू निर्यात 5.2 डॉलर तर तांदळाच्या निर्यातीत सुद्धा 37 टक्के वाढ नोंदवण्यात आली. देशात कोरोनाचे संकट होते. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतास सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. दुसऱ्या लाटेत देशातील हाहाकार अवघ्या जगाने पाहिला. आता मात्र देश या संकटातून सावरत आहे. या संकटाच्या काळात सुद्धा 2019 या वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये निर्यातीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, युरोपियन संघ, जपान, अमेरिका, कोरिया आणि ब्रिटन या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत निर्यात जास्त होती.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply