Take a fresh look at your lifestyle.

अरे बाबांनो, मग कसली आलीय लसटंचाई? पहा नेमके काय म्हटलेय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने

दिल्ली : कोरोना काळात लसींच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेला वाद अजूनही मिटलेला नाही. लसी वेळेवर मिळत नसल्याची तक्रार राज्ये करत असली तरी केंद्र सरकार मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहे. आताही केंद्र सरकारने राज्यांकडे जवळपास 1.24 कोटींपेक्षा जास्त लसी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना बुधवारपर्यंत 2.19 कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे, की जुलै महिन्यात किती लसी मिळणार आहेत याची माहिती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आधीच दिली आहे. खासगी दवाखान्यांना किती लसी देणार याचीही माहिती दिली गेली आहे. राज्यांनी सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या लसींचा विचार करुन लसीकरणाचे नियोजन करावे, अशा सूचना राज्यांना दिल्या आहेत.

Advertisement

जुलै महिन्यात राज्यांना 12 कोटींपेक्षा जास्त लसी मिळतील, असे सांगितले होते. त्यानुसार बुधवारपर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 2.19 कोटींपेक्षा जास्त लसी दिल्याचे सांगण्यात आले. राज्यांना जर लसींची आवश्यकता असेल तर त्यानुसार मागणी करावी, अशा सूचना राज्यांना दिल्या आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, याआधी आरोग्य मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधक लसींबाबत दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 32.92 कोटी लसी दिल्या आहेत. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे आजही लसीकरणासाठी 1.24 कोटीपेक्षा जास्त लसींचे डोस शिल्लक आहेत. तसेच पुढील तीन दिवसात राज्यांना 94 लाख 66 हजार 420 लसींचा पुरवठा होणार आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते. 21 जूनपासून सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणास सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देत आहे. राज्यांनी लसीकरण सुरू केले असले तरी पुन्हा लसींच्या कमतरतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाब आणि छत्तीसगड राज्यांनी याबाबत केंद्र सरकारला माहिती देत पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे की राज्यात लसींची केमतरता असल्याचे केंद्र सरकार आजही मान्य करण्यास तयार नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply