Take a fresh look at your lifestyle.

म्हणून शेतकरी नेते टिकैत कडाडले; पहा नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर केलीय मोदीराज्यावर टीका

दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत, त्यामुळेच तर मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे, डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे.

Advertisement

विरोधक या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राजकीय पक्षानंतर आता शेतकरी आंदोलनातील नेते सुद्धा मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

Advertisement

याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की सामान्य नागरिकांचे नुकसान होतेय, शेतकरी उद्धवस्त होतोय, सर्व काही महाग होत चालले आहे. महागाई आज आऊट ऑफ कंट्रोल झाली आहे. हे तर कंपनी सरकार. जो पर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत घरी जाणार नाही, असे टिकेत यांनी म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत सात महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. तरी देखील केंद्र सरकारने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारने चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. केंद्र सरकारने हे कायदे तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मात्र, केंद्र सरकार सुद्धा कोणत्याही परिस्थितीत कायदे मागे घेण्याच्या विचारात नाही.

Advertisement

या व्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. याआधीसुद्धा अनेक वेळा चर्चा झाली आहे, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार सुद्धा कायदे मागे घेण्यास तयार नाही, त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन सुरूच आहे. आताही कृषिमंत्री तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply