Take a fresh look at your lifestyle.

‘मोदी बाबू हो गया ना पेट्रोल बेकाबू’; पहा कोणी दिला हा नारा…

दिल्ली : पश्चिम बंगालच्या कामगार मंत्र्यांनी आज देशात वाढत्या इंधनाच्या दरावाढीच्या निषेधार्थ 38 किमी सायकल चालविली. कोलकाता येथे राज्य विधानसभेच्या अधिवेशनात पोहचण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसचे नेते बचाराम मन्ना यांनी हुगलीच्या सिंगूर येथील घरून सायकल रॅलीचे आयोजन केले होते. आजच्याच दिवशी कोलकत्ता येथे पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्याने बचाराम मन्ना यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी अभिनव आंदोलन केले.

Advertisement

मंत्री बचाराम मन्ना यांच्यासमवेत शेकडो तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. सायकलला विविध फलक लावण्यात आले होते ज्यावर “मोदी बाबू, पेट्रोल बेकाबाबू” असे बंगाली भाषेत लिहिलेले होते. मन्ना यांनी ट्विटरवर ‘सायकल मार्च’ची छायाचित्रे शेअर केली. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत आता प्रतिलिटर 100.23 रु. आहे.

Advertisement

Advertisement

कामगार मंत्री श्री मन्ना यांनी 2008 मध्ये, टाटा नॅनो प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविला होता. ते सकाळी ८ वाजता घराबाहेर पडले, कोलकाता येथील विधानसभा भवनात अधिवेशात उपस्थित राहण्यासाठी दुपारी १२ वाजता पोहोचले, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे.

Advertisement

“इंधन दरामध्ये झालेली वाढ ही नरेंद्र मोदी सरकारचे अपयश आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी ओलांडल्या आहे. आम्ही याचा निषेध करत आहोत,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. केंद्राचे भाजपाप्रणित सरकार सर्वसामान्यांची आर्थिक लुट करत आहे, असा दावा मंत्री बचाराम मन्ना यांनी केला. बंगाल सरकार आपल्या कल्याणकारी प्रकल्पांमध्ये सर्वसामान्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. जूनमध्ये तब्बल 16 किंमती  वाढविण्यात आल्या. मूल्यवर्धित करामुळे भारतातील सर्व राज्यांमध्ये इंधन दर बदलतात.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply