Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधी ‘त्या’ मुद्द्यावर झालेत आक्रमक; पहा नेमके काय म्हटलेय मोदी सरकारबाबत

दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी भारतात होत नसताना फ्रान्स देशात मात्र या व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे भारतीय राजकारणात पुन्हा राफेल विमानांचा मुद्दा चर्चेत आला आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांत जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या घोटाळ्याच्या बाबतीत म्हटले, की सत्याला फार काळ दडपून ठेवले जाऊ शकत नाही.

Advertisement

माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी सुद्धा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले, की या प्रकरणी ज्या अर्थी फ्रान्समध्ये चौकशी सुरू झाली आहे, त्याअर्थी यामध्ये अनियमितता झाल्याचा संशय आहे. केंद्र सरकारकडे संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. फ्रान्समध्ये चौकशी सुरू होऊन दोन दिवसांनंतही केंद्र सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, यावरुन असे स्पष्ट होत आहे, की सरकारला भ्रष्टाचाराचे हे प्रकरण दडपून टाकायचे आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. १३६ राफेल विमाने खरेदी करण्याचे ठरलेले असताना अचानक ३६ विमाने खरेदी करण्याचा निर्णय का घेतला गेला, याचे उत्तर सरकारने अजूनही दिलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

या प्रकरणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याआधी त्यांनी पत्रकार परिषदेत राफेल विमान खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार आता समोर आला आहे, असे म्हटले होते. या सगळ्या प्रकरणावर अद्याप भाजप किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Advertisement

दरम्यान, याआधी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. पात्रा यांनी राफेल डीलचा उल्लेख करत म्हटले की काँग्रेस पक्ष आता खोटेपणा आणि भ्रम यांचा पर्याय बनला आहे. आज काँग्रेसने पुन्हा राफेल विमान खरेदी प्रकरणी खोटे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकी आधी राहुल गांधी यांनी जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निवडणुकीत काँग्रेसला त्याचा काहीच फायदा झाला नाही. राफेल विमान खरेदी प्रकरणी फ्रान्समध्ये एका एनजीओने तक्रार केली आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तेथे एका न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात राहुल गांधी आणि काँग्रेसने ज्या प्रकारे राजकारणास सुरुवात केली आहे, तो प्रकार खूप दुःखद आहे. चौकशीचाच मुद्दा असेल तर या प्रकरणी देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि कॅगने आपला अहवाल जनतेसमोर आधीच ठेवला आहे. कोणत्या तरी एनजीओने फ्रान्सच्या कोर्टात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर या चौकशीस भ्रष्टाचाराच्या दृष्टीने पाहणे योग्य होणार नाही, असे पात्रा यांनी सांगितले होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.