Take a fresh look at your lifestyle.

आणि मगच होणार आहे पाऊस; पहा कोणत्या भागात अलर्ट जारी केलाय हवामान विभागाने

मुंबई : कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अन्य ठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ८ जुलै रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आजपासून पुढील तीन दिवसात राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ९ ते १० जुलै दरम्यान कोकण परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

देशभरात काही दिवसांपासून मान्सूनचा पाऊस अगदीच गायब झाला आहे. बिहार राज्य वगळता देशात अन्य ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. सुरुवातीला दमदार हजेरी लावली, आता मात्र कुठेच पाऊस होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामासही फटका बसत असून अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. सर्वचजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना काहीसा दिलासा मिळेल अशी बातमी हवामान विभागाने दिली आहे. देशात साधारण ८ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील तीन दिवसात राज्यात सुद्धा पावसाची स्थिती असेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, देशात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात जोरदार पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या संकटात सापडल्या आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणीचीही शक्यता दिसत आहे. त्यामुळे या काळात पाऊस होणे आवश्यक आहे. देशात मान्सून दाखल झाला असून अगदी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र पावसाने काही ठिकाणी उघडीप दिली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. मात्र, पाऊस होत नाही अशी परिस्थिती आहे. देशात काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे.

Advertisement

यंदा मान्सूनमध्ये देशभरात चांगला पाऊस होईल असा अंदाज याआधीच व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा प्रत्ययही येत आहे. सुरुवातीलाच चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता जाणवणार नाही. यंदा बदललेल्या हवामानाचाही अनुभव नागरिकांना मिळाला. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. तौक्त चक्रीवाादळामुळेही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मे महिन्यात देशभरात अनेक ठिकाणी पावसाचेच वातावरण होते. त्यानंतर आता मान्सून दाखल झाला आहे. यावेळीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply