Take a fresh look at your lifestyle.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलेय ‘असे’; पहा मोदी सरकारबद्दलही काय टोमणा हाणलाय त्यांनी

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या आधिवेशनात विरोधी भाजपने केलेल्या गोंधळावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर त्यांनी भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले. तसेच काही महत्वाचे प्रश्न सुद्धा केली. आधिवेशनानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

Advertisement

बारा आमदारांची नियुक्ती केली जात नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचे बारा आमदार निलंबित केले अशी चर्चा आहे, त्यात काही तथ्य नाही. विरोधकांना गोंधळ घालण्यास आम्ही सांगितले नव्हते. आरोग्य विभागाचे कोणतेही पद रिक्त ठेवायचे नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांनी गदारोळ घालण्याचे काहीच कारण नव्हते, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटाची मागणी करण्यात नवीन असे काहीच नव्हते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

Advertisement

ओबीसींच्या आरक्षणासाठी आवश्यक असणारा डेटा केंद्र सरकारकडे आहे. हा डेटा देण्याची मागणी केंद्र सरकार आणि राज्यपाल यांच्याकडे सुद्धा केली होती. राज्य सरकारकडे कोणतीही माहिती नाही. पण आता केंद्राकडील डेटाचाही उपयोग होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये चुका असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. राज्य सरकारकडे डेटा नाही, तर मग त्या डेटामध्ये चुका असल्याचे विरोधी पक्षनेत्यांना कुणी सांगितले. केंद्राकडे जर असा काही डेटा असेल ज्यामध्ये त्रुटी आहेत, तो डेटा पंतप्रधान योजनांसाठी वापरला जातो, मग केंद्र सरकार घोटाळा करतेय का, असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

Advertisement

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आधिवेशनात जोरदार गदारोळ उडाला. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आज दुसरा दिवस सुद्धा वादळी ठरला. आजही विरोधकांनी विधानसभेच्या परिसरात प्रति विधानसभा भरवली. त्यामुळे सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार वाद पाहण्यास मिळाले. त्यानंतर आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर कठोर शब्दांत टीका केली आहे. आता या मुद्द्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.