Take a fresh look at your lifestyle.

तरीही ‘तितक्या’ लोकांचा आहे मास्क वापरण्यास विरोध; पहा कशामुळे अवघा देश येऊ शकतो संकटात..!

दिल्ली : कोरोना आटोक्यात आल्यानंतर लोकांनी पुन्हा बेजबाबदारपणा सुरू केला आहे. कोरोना प्रतिबंधक नियम डावलण्यात ही मंडळी धन्यता मानत आहे. फिरायला जाणे, गर्दी करणे, मास्कचा कंटाळा या गोष्टी तर नेहमीच्याच झाल्या आहेत. सरकारच्याही आता लक्षात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गंभीर इशारा दिला आहे.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अग्रवाल यांनी सांगितले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यात आतापर्यंत जे यश मिळाले त्यास कोरोना प्रोटोकॉल तोडणारे लोक नष्ट करू शकतात. कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने लोकांनी पुन्हा फिरण्यास सुरुवात केली आहे. कोरोना नियमांकडेही दुर्लक्ष करत आहेत. जर असेच सुरू राहिले तर आतापर्यंत ज्या सवलती दिल्या आहेत, त्या पुन्हा मागे घेतल्या जाऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला. कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे, आजही हा विषाणू मर्यादीत स्वरुपात अस्तित्वात आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, याआधी एक सर्वे करण्यात आला होता. देशात आजही बहुतांश नागरिक मास्क वापरण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे, असा दावा या सर्वेद्वारे करण्यात आला होता. ऑनलाइन सोशल मीडिया मंच लोकल सर्किलने केलेल्या सर्वेनुसार लसीकरण केंद्रांवर सुद्धा मास्क वापरण्याची तसदी लोक घेत नाहीत. जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात दुसऱ्या लाटेने प्रचंड नुकसान केले. या सर्वेमध्ये सामील 67 टक्के लोकांनी मान्य केले की त्यांच्या जिल्ह्यात, शहरात लोक खूप कमी प्रमाणात मास्कचा वापर करतात आणि काही जण तर मास्क वापरत सुद्धा नाहीत. या सर्वेमध्ये देशातील 312 जिल्ह्यांतील जवळपास 33 हजार लोकांचा समावेश केला होता. 32 टक्के लोकांनी असे सांगितले की ज्यावेळी लसीकरण केंद्रावर गेलो त्यावेळी कमी प्रमाणात मास्क प्रोटोकॉलचे पालन करण्यात येत होते.

Advertisement

लसीकरण केल्यानंतरही काही जणांच्या घरातील सदस्य पुन्हा कोरोनाबाधित झाले, यामागे सुद्धा लसीकरण केंद्रांवर लोकांनी मास्क वापरण्याचे टाळल्याने कोरोना संक्रमण वाढले, असे सांगण्यात आले. या सर्वेमध्ये असेही दिसून आले होते, की 44 टक्के लोक कपड्याचा मास्क वापरतात. मात्र, हे कापडाचे मास्क अत्यधिक संक्रमक डेल्टा या प्रकारास रोखण्यास सक्षम नाहीत. कोरोना संक्रमण असणाऱ्या जिल्ह्यातील नागरीकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे 91 टक्के लोकांनी समर्थन केले, तर 8 टक्के लोकांनी या निर्णयाचा विरोध केला.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply