Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बाजारात सुरू आहे बुल ट्रेंड; पहा इन्व्हेस्टर्सची कशामुळे होत आहे चांदी..!

मुंबई : कोरोनाच्या संकटात संपल्यानंतर देशास मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांना या घातक विषाणूने जेरीस आणले. कोट्यावधींचे नुकसान झाले. शेअर बाजार सुद्धा यास अपवाद नव्हता. कोरोना संकटात शेअर बाजारासही नुकसान सहन करावे लागले.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे धास्तावलेल्या परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 1 ते 30 जून या काळात 17 हजार 215 आणि बॉण्ड मार्केटमधून जवळपास 3 हजार 946 कोटी रुपये काढून घेतले होते. याआधी सुद्धा एप्रिल आणि मे महिन्यात सुद्धा गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून अनुक्रमे 9 हजार 435 रुपये आणि 2 हजार 666 कोटी रुपये काढून घेतले होते.

Advertisement

यानंतर सुद्धा शेअर बाजार मजबूत स्थितीत राहिला. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी पुन्हा शेअर बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. मागील काही दिवसांपासून या गुंतवणूकदार मंडळींनी भारतीय शेअर बाजारात तब्बल 13 हजार 269 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

Advertisement

देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर राज्यांनी साधारण जून महिन्यापासून लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. दैनंदिन जीवनही सुरळीत होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणूकदारांनी सध्या तंत्रज्ञान आणि विमा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये पैसे गुंतवणूक केली आहे. भारता प्रमाणेच तैवान, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स या देशांमध्ये सुद्धा परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे.

Advertisement

कोरोना संकटात सुद्धा देशात आरोग्य आणि सेनेटायजेशनसह अन्य क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात नव्या कंपन्या उदयास आल्या आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात एकूण 1 लाख 3 हजार 64 नव्या कंपन्या अस्तित्वात आल्या होत्या. मात्र, 2020-21 या वर्षात यामध्ये मोठी वाढ होऊन आता कंपन्यांची संख्या 1 लाख 47 हजार 237 इतकी झाली आहे. म्हणजेच, एकाच वर्षात यामध्ये 43 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कृषी आणि संबंधित क्षेत्रात एकूण 5 हजार 10 कंपन्या होत्या, 2021-21 मध्ये यांची संख्या 11037 इतकी झाली आहे. अन्य क्षेत्रात सुद्धा नव्या कंपन्यांची संख्या वाढली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply