Take a fresh look at your lifestyle.

डेल्टा करोनाने घातलेय थैमान; पहा काय परिस्थिती उद्भवलीय ‘तिथे’..!

दिल्ली : कोरोनाने आता स्वतःचे रूप बदलत अधिक घातक होण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. डेल्टा व्हेरिएंट अतिशय घातक असून जगभरातील 98 देशांमध्ये फैलावला आहे. आता इंडोनेशिया या देशात डेल्टाने हाहाकार उडाला आहे.

Advertisement

या व्हेरिएंटमुळे देशात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत. तसेच मृयूंच्या संख्येत सुद्धा कमालीची वाढ झाली आहे. या देशात गेल्या दोन ते तीन आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या परिस्थिती इतकी भीषण आहे की प्लास्टिकचे तंबू तयार करून आयसीयू तयार केले आहेत. आणि येथे कोरोना संक्रमित रुग्णांचे उपचार सुरू आहेत. फुटपाथवर ऑक्सिजन टॅंक ठेवले आहेत. कोरोनामुळे देशात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच खराब होत आहे.

Advertisement

याआधी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड १९ च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आजमितीस जगातील ९८ देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले होते, की आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत चालला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. त्यामुळे सुद्धा जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत चालले आहे. सद्यस्थितीत अल्फा व्हेरिएंटची प्रकरणे १७२ देशात आढळली आहेत.

Advertisement

तसेच गामा व्हेरिएंट ७२ आणि बीटा व्हेरिएंटची प्रकरणे १२० देशात आढळली आहेत. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान १० टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply