Take a fresh look at your lifestyle.

झालाच की घोटाळा..! चीनच्या ‘त्या’ कारनाम्याने अवघ्या जगात पुन्हाही वेगळेच संकट

बीजिंग : अवघे जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना चीनने मात्र दुसरेच उद्योग सुरू केले आहेत. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या दक्षिण चीन समुद्रावर पूर्ण कब्जा मिळवण्याचा कुटील डाव चीनने आखला आहे. यासाठी चीन काहीही करण्यास तयार असून आंतरराष्ट्रीय कायद्यांचासुद्धा विचार करत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Advertisement

द नेशनल इंटरेस्ट पत्रिकेत जेम्स होम्स यांनी एक अहवालात याबाबत खुलासा केला आहे. या अहवालात म्हटले आहे, की मागील वर्षात चीनचे रक्षा मंत्र्यांनी सैन्यास सांगितले होते की समुद्र परिसरात युद्धासाठी तयार राहण्याची गरज आहे. याआधी संयुक्त राष्ट्रांच्या ट्रिब्युनलने निर्णय दिला होता की दक्षिण चीन समुद्रावरील वर्चस्वाचे चीनचे दावे चुकीचे आहेत. एक मजबूत समुद्र तटीय देश दुसऱ्या कमजोर देशांचे समुद्र क्षेत्र आणि पाण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, असेही संयुक्त राष्ट्रांनी म्हटले होते. ट्रिब्युनलच्या या निर्णयामुळे चीनला जोरदार झटका बसला आहे. फिलिपिन्सच्या समुद्री क्षेत्रावर कब्जा मिळवण्याचे असेच प्रयत्न चीन सध्या करत आहे. दक्षिण चीन समुद्रावर पूर्ण कब्जा मिळवण्यासाठी चीनने आता आधिक आक्रमक धोरण स्वीकारले असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

चीनच्या वाढत्या दादागिरीस जगातील अनेक देश वैतागले आहेत. चीनचा त्रास आता जास्तच वाढत चालला आहे. कोरोनाने जगभरात बदनामी केली असली तरी चीनला त्याचे काहीच वाटत नाही. उलट या संकटाच्या काळातही चीनने कुटील डाव सोडलेले नाहीत. कोणत्या देशास कधी त्रास द्यायचा, हे चीनच्या राज्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे. जुने वाद लक्षात ठेवत दुसऱ्या देशांना त्रास देण्याचे उद्योग चीन करत आहे.अशाच पद्धतीने चीनने आता ऑस्ट्रेलियास त्रास देण्यास सुरुवात केली आहे. या देशास चीन विरोधात तक्रार देण्याची वेळ आली आहे. कारण, चीनने दारूच्या निर्यातीवर टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने चीन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Advertisement

तसे पाहिले तर, काही दिवसांपासून चीन आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. चीनने मागील वर्षात ऑस्ट्रेलियाच्या मद्यावर तब्बल 218 टक्के टॅक्समध्ये वाढ केली होती. कोरोना विषाणूचा उगम आणि चिनी कंपनी हुवावेस 5 जी नेटवर्क बनवण्यास ऑस्ट्रेलियाने विरोध केल्यानंतर या दोन्ही देशात वाद सुरू झाले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.