Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सामान्य भारतीयांवर वाढणार ‘कार’भार..! पहा कशाचा झटका बसणार खिशाला..!

दिल्ली : देशात कोरोना पाठोपाठ महागाईने नागरिकांना हैराण केले आहे. आताही भाववाढ सुरुच आहे. सर्वच क्षेत्राला महागाईचा फटका बसत आहे. वाहन निर्मिती कंपन्यांनी आता दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमतीत वाढ होत आहे. स्टील आणि मौल्यवान धातूंसारख्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे जपानच्या होंडा कंपनीने पुढील महिन्यापासून कारच्या किमतीत वाढ करण्याचे नियोजन केले आहे.

Advertisement

कारच्या किमतीत वाढ करण्याचा विचार केला असला तरी त्याचा किती भार ग्राहकांवर टाकावा, याबाबत कंपनी सध्या विचार करत असल्याचे सांगण्यात आले. सध्या स्टील, अॅल्यूमिनियम आणि अन्य काही मौल्यवान धातूंच्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असल्याचे होंडा कार्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश गोयल यांनी सांगितले.

Advertisement

देशात काही वर्षांपासून वाहनांचा वापर वाढला आहे. औद्योगिकरण आणि तितक्याच वेगाने वाढणारी शहरे यामुळे जगभरात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. दररोज लाखोंच्या संख्येत नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. दुचाकी आणि चारचाकी या दोन्ही प्रकारच्या वाहनांना मागणी वाढली आहे. विदेशात सुद्धा मागणी वाढली आहे. कोरोनाचे संकट असतानाही काही दिवसांपासून वाहनांचे मार्केट मात्र तेजीत आहे. तर दुसरीकडे वाहन कंपन्या दरवाढ करत आहेत. काही कंपन्यांनी दरवाढीचे नियोजन केले आहे. काही दिवसांपूर्वी हिरो कंपनीने असा निर्णय घेतला होता. त्यानंतर होंडा कंपनीने सुद्धा असाच निर्णय घेण्याचे जवळपास निश्चित केले आहे.

Advertisement

साधारण ऑगस्टपासून कंपनी दरवाढ करण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या चारचाकी वाहनांच्या किमतीत किती वाढ होईल, याबाबत मात्र अद्याप काहीही स्पष्ट नाही. कंपनी सध्या दरवाढीच्या तपशीलावर विचार करत आहे. वाहनांची खरेदी किंमत कमी राहिल यास प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा किती भार स्वतः घ्यायचा आणि किती ग्राहकांवर टाकायचा, याबाबत कंपनी सध्या विचार करत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply