Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधी-ठाकरेंच्या ‘त्या’ मुद्द्यावर नेटकऱ्यांना झालीय पंतप्रधान मोदींची आठवण; पहा नेमका काय आहे मुद्दा

मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ आधिवेशनापूर्वी पत्रकार परिषद घेण्याचे धाडस झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय, यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे,’ असे भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही पत्रकारांना सामोरे जात नसल्याची आठवण अनेकांनी काढली आहे.

Advertisement

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजप नेते या सरकार विरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. राज्यात मध्यंतरी ज्या घटना घडल्या त्यावरुन भाजपने सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. आताही आधिवेशनाची घोषणा झाल्यापासून भाजपने आधिक आक्रमक रणनिती आखली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लवकर घेण्यात यावी आणि आधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, या मागण्या भाजपने केल्या आहेत. मात्र, राज्य सरकार आधिवेशनाचा कालावधीत वाढ करण्याच्या मूडमध्ये नसल्याने आता आंदोलन चालू आहेत.

Advertisement

Advertisement

दरम्यान, भातखळकर यांना प्रत्युत्तर देताना शिवानंद यांनी म्हटलेय की, प्रधानसेवकांची पत्रकार परिषद आठवते का कधी? प्रकांड पंडित महाज्ञानी मा. भातखळकर? नसेल च आठवत ? त्यांना लोकांच्या मनातले नव्हे तर,त्यांच्या मनातले च सांगायची सवय आहे! 25वर्षे संसार केलात युतीत तेव्हा पुण्यच नव्हे तर पापात पण सारखेच भागिदार? भाजप कडे आता नैतिकता सदाचार नाहीच.

Advertisement

डॉ. दत्तात्रय परहाद यांनी लिहिलेय की, हो राहूल गांधी खरोखर त्या खोट्या छपन्न इंची फेकूपेक्षा धैर्यवान समझदार देशप्रेमी भाषेचं नीट ज्ञान असलेला व अर्थशास्त्र वैश्विक राजकारणाची नीट ज्ञान असलेला माणूस आहे. त्याला ××मी संघोट्यांनीच षडयंत्र करून बदनाम केलं. तो आजच्या नीच राजकारणाला पुरून ऊरत नाही हे खरंय म्हणून त्यासाठी. तर, निलेश निम्हण यांनी म्हटलेय की, हो राहूल गांधी खरोखर त्या खोट्या छपन्न इंची फेकूपेक्षा धैर्यवान समझदार देशप्रेमी भाषेचं नीट ज्ञान असलेला व अर्थशास्त्र वैश्विक राजकारणाची नीट ज्ञान असलेला माणूस आहे. त्याला ××मी …नीच षडयंत्र करून बदनाम केलं. तो आजच्या नीच राजकारणाला पुरून ऊरत नाही हे खरंय म्हणून त्यासाठी.

Advertisement

हरीश ढोरे लिहितात की, मुख्यमंत्री आता नाहीतर संध्याकाळी कींवा उद्या पत्रकार परिषदेत बोलतील पण पंतप्रधान ७ वर्ष झाले एकही पत्रकार परिषदेत घेतली नाही … राहुल गांधी त्यांच्या पेक्षा बरे का?? आपण काय लिहितो काय बोलतो जरा विचार करावा…. रिप्लाय वाचत चला. तर, ‘ते मोदींना ही विचारायचं धाडस ठेवा साहेब, आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली नाही ही news होते अणि मोदी नी पत्रकार परिषद घेतली ही news होऊ शकते फरक समजून घ्या’, असे दीपक कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply