Take a fresh look at your lifestyle.

म्हणून भाजपला वाटतात, ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे..! पहा नेमक्या कोणत्या मुद्द्यावर झालेत आक्रमक

मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ आधिवेशनापूर्वी पत्रकार परिषद घेण्याचे धाडस झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय, यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे,’ असे भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement

राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या आधिवेशनास आजपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींनी वेग घेतला आहे. विरोधकांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकारची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीने सुद्धा जशास तसे उत्तर देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या आधिवेशनात चांगलाच गदारोळ उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. याच दरम्यान भाजपने आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्र्यांवरच जोरदार टीका केली आहे.

Advertisement

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजप नेते या सरकार विरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. राज्यात मध्यंतरी ज्या घटना घडल्या त्यावरुन भाजपने सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. आताही आधिवेशनाची घोषणा झाल्यापासून भाजपने आधिक आक्रमक रणनिती आखली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लवकर घेण्यात यावी आणि आधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, या मागण्या भाजपने केल्या आहेत. मात्र, राज्य सरकार आधिवेशनाचा कालावधीत वाढ करण्याच्या मूडमध्ये नाही. तसेच या आधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होण्याचीही शक्यता कमी असल्याचे दिसत आहे.

Advertisement

आधिवेशनात पुरवणी मागण्या आणि विधेयके हे कामकाज मुख्यत्वे असेल, असे सांगण्यात येत आहे. या आधिवेशनात जर विधानसभा अध्यक्षांची निवड झाली नाही तर काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, या आधी अध्यक्षपद काँग्रेसकडेच होते. त्यामुळे यावेळीही अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच प्रबळ दावेदार असून या मुद्द्यावर आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे आघाडी सरकारमधील तिनही पक्षांच्या नेत्यांनी अनेक वेळा सांगितले आहे.

Advertisement
  • Advertisement

    कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply