Take a fresh look at your lifestyle.

दानवेंनी दिलेय राज्य सरकारला ‘हे’ आव्हान; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये गोंधळ घालून गैरवर्तन केल्याप्रकरणी पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया या आमदारांना निलंबित करण्यात आलेले आहे. भाजप आमदारांवर कारवाई झाल्याने  केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

Advertisement

Advertisement

दानवे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही झगडत असतांना, आमच्या लोकांवर अशा प्रकारची कारवाई होणे चूक आहे. अशा प्रकारच्या कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही सहन करु, पण ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत भाजपाचा संघर्ष सुरुच राहील.’ दरम्यान, आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्यावर परिस्थितीचे भान ठेवतात आमदार आशिष शेलार यांनी संजय कुटे, गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदारांना वेलमधून जागेकडे नेले.  राजदंड पळवण्यावरुन सुरु झालेल्या गोंधळातून नंतर अध्यक्षांच्या दालनाबाहेर धक्काबुक्कीही झाल्याने १२ आमदारांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली अशी घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

दरम्यान, नारायण जाधव यांनी प्रतिक्रिया लिहिली आहे की, संसदेत असा गोंधळ घातला असता तर कोणती कार्यवाही झाली असती?.. आणि ओबीसी आरक्षणाबाबत आपल्याला जेवढा पुलका आहे तोच मराठा आरक्षासंदर्भात असता तर आज मराठ्यांना आरक्षण भेटलं असतं..

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply