Take a fresh look at your lifestyle.

‘पारले-जी’ला असाही झटका; पहा १ लाखांसाठी नेमके काय घोटाळे केलेत कामगारांनी..!

मुंबई : पारले-जी म्हणजे अनेकांच्या पोटाचा आणि आवडीचा आधार. जगभरात सर्वाधिक विकले जात असलेल्या या बिस्कीट कारखान्याच्या कंपनीने कोविड झाल्यास आपल्या कामगारांना १ लाखाचे अर्थसहाय्य देण्याची स्कीम सुरू केली. मात्र, त्याचाच झटका कंपनीला सहन करावा लागला आहे.

Advertisement

१ लाखाचे अर्थसहाय्य दिले जात असून याचा लाभ घेण्यासाठी काहींनी रुग्णालयातील एका कंत्राटी कक्षसेवकाला हाताशी धरून वेगळाच प्रकार केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे स्वॅब घेतल्यास तो पॉझिटिव्हच येईल. त्यामुळे अशा पॉझिटिव्ह रुग्णाचा स्वॅब घेऊन तो ५ हजार रुपयांमध्ये कामगारांना विकला जात असल्याचा प्रकार खामगाव येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे.

Advertisement

हॉस्पिटलमध्ये भरती चार पॉझिटिव्ह रुग्णांनी नाकात दुखत असल्याची तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आलेला आहे.  डॉ. प्राची निचळ यांच्याकडे तक्रार आल्यावर त्यांनी याचा पाठपुरावा केला. या रुग्णांचे स्वॅब घेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यावर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे यांनी केलेल्या सखोल चौकशीअंती कंत्राटी सुरक्षा रक्षक विजय राखोंडे यानेच हे स्वॅब घेऊन विक्री केल्याचे स्पष्ट झालेले आहे. या सेवकासह एकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply