Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावर कॉंग्रेस भडकली; पहा भाजपवर कोणत्या शब्दात केलीय टीका

मुंबई : राज्यात सध्या केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत. राज्यात काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे केंद्र सरकारच्या कारभारावरील संशय वाढला आहे. विरोधी पक्षांमध्ये भिती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर भाजप करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

Advertisement

कोणी कितीही दडपशाही केली तरी त्यास घाबरत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती सुद्धा वाढली आहे. मग, ईडी त्यांची चौकशी का करत नाही, असा सवाल काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, जो भाजपमध्ये प्रवेश करतो त्यास अभय दिले जाते मात्र विरोधक आहेत त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला जातो, हे आजिबात बरोबर नाही. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबतही त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Advertisement

याआधीही त्यांनी राज्यपाल यांच्यावर टीका केली होती. राज्यपालांचे कार्यालय भाजप कार्यालय झाले आहे, असा आरोप त्यांनी केला होता. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात व्हावी अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे. मात्र या मुद्यावर भाजप राज्यपालांना पुढे करून राजकारण करत आहे. मात्र, त्यांच्या राजकारणास आम्ही आजिबात भीक घालत नाही. आमदारांच्या कोरोना तपासण्या झाल्यांनातरच पुढील परिस्थिती स्पष्ट होईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Advertisement

यानंतर केंद्राच्या कृषी कायद्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. केंद्राने आणलेल्या या काळ्या कायद्यांना काँग्रेसचा विरोध आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार व्हावा, असे राज्य सरकारला वाटते. त्यामुळे केंद्राचे कृषी कायदे कोणत्याही परिस्थितीत राज्यात लागू होणार नाहीत. राज्य सरकार स्वतंत्र कायदा तयार करील. त्यासाठी आवश्यक कार्यवाही करुन नागरिक आणि शेतकऱ्यांची मते विचारात घेतली जातील. आणि त्यानंतर कायदा तयार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र पाठवल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. राज्यपाल यांचे कार्यालय म्हणजे भाजप कार्यालय झाले आहे. राज्यपालांच्या सांगण्यावरुन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याते येत आहे, हे सांगण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. राज्यपाल भाजप आणि संंघाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या १२ रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी बहुमताने जिंकेल, असा दावा केला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply