Take a fresh look at your lifestyle.

भन्नाटच की.. तब्बल १२५ देशांमध्ये आहे भारताच्या ‘त्या’ शेतमालास बंपर मागणी..!

मुंबई : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताने तब्बल ३० हजार कोटी रुपयांचा तांदूळ विदेशात निर्यात केला आहे. ४६.३० मेट्रीक टन तांदळाची निर्यात देशाने केली आहे. चीन, पाकिस्तान, अमेरिका आणि आखाती देशांसह एकूण १२५ देशांमध्ये भारताने बासमती तांदळाची निर्यात केली आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानमध्ये सुद्धा बासमती तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. पाकिस्तानही या तांदळाची निर्यात करतो. मात्र, भारताने पाकिस्तानला केव्हाच मागे टाकले आहे. भारताच्या तांदळाचा दर्जा सुद्धा चांगला आहे. परिणामी भारतीय तांदळास मागणी वाढत आहे.

Advertisement

देशात आजमितीस अन्न धान्याचा कोणताही दुष्काळ नाही. देशातील कोट्यावधी लोकांना दोन वेळचे अन्न देऊन दुसऱ्या देशांना धान्य देण्याची ताकद आज भारतात आहे. त्यामुळेच तर अन्न धान्याच्या निर्यातीत आपला देश रोजच नवनवे किर्तीमान नोंदवत आहे. भारतीय बासमती तांदळाची तर विदेशांना इतकी भुरळ पडली आहे, की या एकाच प्रकारच्या तांदळाची अब्जावधी रुपयांची निर्यात जगातील विविध देशात होत आहे. कधी काळी देशात गहू नसल्याने परदेशातून गहू आणावा लागत होता. आज मात्र भारतात गव्हाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन होत असून या गव्हास विदेशातूनही मागणी वाढली आहे.

Advertisement

मेरठ येथील बासमती निर्यात विकास प्रतिष्ठानचे मुख्य वैज्ञानिक डॉ. रितेश शर्मा यांनी सांगितले, की आज उत्तर प्रदेश तांदळाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकरी त्यांच्याकडील तांदूळ निर्यातदारांना विकतात. त्यानंतर निर्यातदार बासमती तांदळाची परदेशात निर्यात करतात. दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये भारताने तिमोर-लेस्ते, प्यूर्टो रिको, ब्राझील, पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे, इस्वातिनी, म्यानमार आणि निकारागुआ या देशांना १८८ मेट्रीक टन नॉन बासमती तांदूळ निर्यात केला.

Advertisement

यानंतर २०१९-२० मध्ये या देशांना १९७ मेट्रीक टन तांदूळ निर्यात केला होता. परंतु, २०२०-२१ मध्ये या देशांत निर्यातीचे प्रमाण वाढून १.५३ लाख मेट्रीक टन झाले आहे. भारताने सन २०२०-२१ दरम्यान येमेन, इंडोनेशिया, भूतान, फिलिपीन्स, इराण, कंबोडिया आणि म्यानमार या सात देशांना मोठ्या प्रमाणात अन्न धान्याची निर्यात केली. तांदूळ आणि गहू व्यतिरिक्त २०१९-२० मध्ये १०२ मेट्रीक टन धान्य निर्यात केले गेले. आता यामध्ये सुद्धा वाढ होऊन निर्यात ५२१ टनपर्यंत वाढली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply