Take a fresh look at your lifestyle.

वाव.. मोदी सरकारची कामगिरी भन्नाट..! अमेरिका, युरोप, जपानलाही टाकले की ‘त्यात’ मागे..!

दिल्ली : कोरोनाच्या संकटात देशात अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. संकटांची यादी सुद्धा मोठी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला आहे. तरी देखील सरकारच्या उत्पन्नात मात्र फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. जीएसटी संकलनातही सरकारने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. त्यानंतर आता निर्यातीच्या क्षेत्रातही जोरदार कामगिरी केली आहे.

Advertisement

कोरोना काळात देशातील उद्योग व्यवसायांनाही फटका बसला आहे. मात्र तरीसुद्धा कामगिरीत सातत्य ठेवल्याने देशाने निर्यातीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल 95 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6 लाख 93 हजार 500 कोटी रुपये इतकी निर्यात झाली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतची ही सर्वाधिक निर्यातीचा आकडा आहे. मागील 2020-21 च्या पहिल्या तिमाहीतील निर्यातीपेक्षा यावेळची निर्यात 85 टक्के जास्त आहे. तसेच 2019-20 च्या पहिल्या तिमाहीतील निर्यातीपेक्षा 18 टक्के जास्त आहे.

Advertisement

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली. 2021-22 या वर्षात 400 अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दीष्ट सरकारने निश्चित केले आहे, असे त्यांनी सांगितले. कामगारांची जास्त संख्या असलेल्या अनेक क्षेत्रांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील वस्तू निर्यात 5.2 डॉलर तर तांदळाच्या निर्यातीत सुद्धा 37 टक्के वाढ नोंदवण्यात आली. देशात कोरोनाचे संकट होते. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतास सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. दुसऱ्या लाटेत देशातील हाहाकार अवघ्या जगाने पाहिला. आता मात्र देश या संकटातून सावरत आहे. या संकटाच्या काळात सुद्धा 2019 या वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये निर्यातीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, युरोपियन संघ, जपान, अमेरिका, कोरिया आणि ब्रिटन या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत निर्यात जास्त होती.

Advertisement

दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असतानाही मोठ्या संख्येने नव्या कंपन्या अस्तित्वात आल्या. 2019-20 या आर्थिक वर्षात एकूण 1 लाख 3 हजार 64 नव्या कंपन्या अस्तित्वात आल्या होत्या. मात्र, 2020-21 या वर्षात यामध्ये मोठी वाढ होऊन आता कंपन्यांची संख्या 1 लाख 47 हजार 237 इतकी झाली आहे. म्हणजेच, एकाच वर्षात यामध्ये 43 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply